शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संगीत थेरपीचा प्रचार हवा तसा झाला नाही - मंजुषा राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:27 IST

विशेष मुलांवर उपचाराची संगीतात ताकद

विहार तेंडूलकरसंगीतामध्ये खूप मोठी ताकद आहे, जी अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. संगीत मेंदूचा विकास घडवते, आकलनशक्ती, होकारार्थी मानसिकता वाढवते. केवळ सामान्यच नव्हे तर विशेष मुलांवरही या संगीताव्दारे उपचार करता येतात. पण अजूनपर्यंत ‘म्युझिक थेरपी’चा प्रचार आणि प्रसार झालेला नाही, अशी खंत संगीत विशारद आणि विशेष मुलांसाठी म्युझिक थेरपीच्या माध्यमातून काम करणाऱ्या मंजुषा राऊत (औरंगाबाद) यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रश्न : म्युझिक थेरपीची संकल्पना तुमच्या मनात कशी आली?उत्तर : मी एका दिव्यांगांच्या शाळेत भेट द्यायला गेले होते, त्यावेळी तेथील विशेष मुले ही सीडीवर गाणी ऐकताना दिसली. त्यावेळी मी घरी येऊन विचार केला, संगीत विशारद तर मी होतेच; त्यामुळे या विषयात काम करणे सोपे होते. मी या विषयाच्या अंतरंगात गेले आणि त्यावेळी मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.प्रश्न : म्युझिक थेरपी ही कशाप्रकारे काम करते?उत्तर : म्युझिम थेरपीमध्ये एक महत्वाचं तत्व लक्षात ठेवलं पाहिजे ते म्हणजे मुलांसमोर नुसतं गाणं म्हणणं वा त्याला नुसतं ऐकायला लावणं, हे अपेक्षित नाही तर यामध्ये त्या मुलाचा प्रत्यक्ष सहभाग असणं महत्वाचं. त्या मुलाच्या वैचारिक पातळीवर जाऊन विचार केला पाहिजे आणि त्यापध्दतीने त्याच्या बौध्दीक पातळीला झेपेल असे सोपे आणि चांगले संगीत ऐकवले गेले, त्याला संगीताच्या तालावर नाचायला, डोलायला शिकवले तर त्याच्यावर जास्त परिणाम करू शकते.थेरपीचे फायदेविशेष मुलेच असं नाही तर एक सामान्य मूलही संगीताला जास्त प्रतिसाद देतात. कारण संगीत ही बाब अशी आहे की ती मेंंदूपर्यंत थेट पोहोचते. त्यामुळे ४ ते ५ वर्षांपर्यंत मुलांना गाण्यांच्या माध्यमातून जर एखादी बाब शिकवली गेली तर त्यांची भाषा सुधारेलच; शिवाय त्यांचा पूर्ण बौध्दीक विकास होईल.मुले अन् थेरपीविशेष मुलांमध्ये कोणतीही बाब ग्रहण करण्याची आणि ती बाब लक्षात ठेवण्यासाठीच्या पेशी कमकुवत असतात, मृत असतात. त्यामुळे उर्वरित पेशीवर ताण येतो. म्युझिक थेरपी या कमकुवत पेशींना सशक्त करतं, जागृत करतं. पण हे सगळं टप्प्याटप्प्याने आणि जसजसा मुलांचा विकास होतो, तसतसं करणं गरजेचे आहे.४ ते ५ वर्षांपर्यंत मुलांना गाण्यांच्या माध्यमातून जर एखादी बाब शिकवली गेली तर त्यांची भाषा सुधारेल. - मंजुषा राऊत

टॅग्स :Jalgaonजळगाव