शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लोकसहभाग आणि सरकारच्या समन्वयातून गड-किल्ल्यांचे संवर्धन -श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 6:41 PM

दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला. एका कार्यक्रमासाठी ते चाळीसगावी आले असता त्यांच्याशी बातचीत झाली. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे उपस्थित होते.प्रश्न : किल्ले संवर्धनाचे काम कसे सुरू झाले?उत्तर : खरं म्हणजे आपले किल्ल्यांबद्दलचे ज्ञान म्हणजे माहीत असलेल्या किल्ल्यांवर जाणे. अर्थात अशा सर्वपरिचित किल्ल्यांची संख्याही फारच कमी आहे. किल्ल्यांचा परिचय करुन देणारे लिखित साहित्यही उपलब्ध नाही. प्रसिद्ध असणाऱ्या गड-किल्ल्यांची दुरावस्था असताना प्रकाशझोतात नसणाºया इतर किल्ल्यांची काय अवस्था असेल? हा प्रश्न म्हणजे आमच्या कामाची सुरुवात आहे. यातूनच पुढे गड-किल्ले शोध मोहीम सुरू केली.प्रश्न : किती गड-किल्ले शोधण्यात यश आले?उत्तर : राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. १५ वर्षांपूर्वी २००४ मध्ये प्रतिष्ठानतर्फे दुर्ग संवर्धनाचे काम सुरू केले. एकूण ४०० किल्ल्यांवर आम्हाला पोहचता आले. यासाठी शिवरथ यात्रा काढली. यामुळे बहुतांशी गड-किल्ले पहिल्यांदा समोर आले. दुरवस्था आणि अनास्था यामुळे हे दुर्ग वैभव दुर्लक्षित होत असल्याचे शल्य वेदनादायी होते. मी स्वत: देशभरातील १६६३ किल्ले पाहिले आहेत.प्रश्न : गड-किल्ले संवर्धनात येणाºया अडचणी कोणत्या?उत्तर : राज्यातील फक्त ७८ किल्ल्यांना सरकारच्या संरक्षणाचे कवच आहे. उर्वरित ३२२ किल्ले आजही असंरक्षित आहेत. ७८ पैकी ४६ राज्य तर ३२ किल्ले केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. बहुतांशी गड-किल्ल्यांच्या जमिनी स्थानिक गावकºयांच्या नावे आहेत. सातबाºयावर ही नावे आहे. तर किल्ल्यांच्या पायाथ्याशी असणाºया जमिनीचे वाद वनविभाग व राज्य सरकार असे जटील आहे. त्यामुळेच किल्ल्यांच्या संवर्धनात अडचणी येतात. पावसाळी अधिवेशनात गड-किल्ले दुरुस्ती व संवर्धनाचा शासन निर्णय झाल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. वनविभाग आणि शासन यांनी समन्वय ठेवून गड- किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी पुढे यावे, अशी आमची मागणी आहे.प्रश्न : प्रतिष्ठानचे ठळक कार्य काय ?उत्तर : ३० मार्च २०१६ मध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवला. या विक्रमाची लिमका वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. १४ मे १६५७ ही संभाजी महाराजांची जन्मतारीख पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदवली. इयत्ता सातवीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गडांवर प्रवेशव्दार उभारले. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रव्धज फडकवला. पद्मदुर्ग किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव