चाळीसगाव, जि.जळगाव : दिल्ली येथे जंतर मंतर येथे संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब मुदार्बाद म्हणणाºया कथित प्रवृत्तीचा निषेध चाळीसगाव येथे रविवारी करण्यात आला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही या वेळी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना दिले. संविधान ही भारतीय लोकशाहीची अमीट ओळख असून, लोकशाहीप्रधान देश म्हणून जगात भारताने आपले नाव अधोरेखित केले आहे.संविधानाची प्रत जाळून काही समाजकंटकांनी आपल्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे. डॉ. बाबासाहेबांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.दलित हक्क संघर्ष समितीचे धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव, अॅड. राहुल जाधव, जि.प.चे माजी सदस्य मंगेश राजपूत, शरद जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.
संविधान जाळणाऱ्यांचा चाळीसगाव येथे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:36 IST