चाळीसगाव, जि.जळगाव : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाळीसगाव तेली पंच मंडळाच्यावीने अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सायंकाळी पाच वाजता घाटरोडवरील हॉटेल शिवनेरीपासून संताजी जगनाडे महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी तेली मंच मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामराव चौधरी, उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भगवान चौधरी, खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, आमदार डॉ .सतीश पाटील, प्रदीप देशमुख, रामचंद्र जाधव, सदानंद चौधरी, भगवान चौधरी, पंडित चौधरी, अनिल ठाकरे, भारत चौधरी, नामदेव चौधरी, पप्पू अर्जुन चौधरी, हर्षल चौधरी, आर.के.चौधरी, सुनील चौधरी, निंबा पवार, प्रभाकर चौधरी, रवींद्र चौधरी, सुरेश चौधरी, आण्णा माणिक, ईश्वर पवार, सुनील चौधरी चौधरी, राजेंद्र चौधरी, विवेक चौधरी, गोकुळ चौधरी, मनोज चौधरी, प्रवीण चौधरी, जगदीश चौधरी, सुधीर चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजबांधवांच्या उपस्थितीत ढोल-ताशांचा गजरात घाटरोडमार्गे, सराफ बाजार, बहाळ दरवाजाकडून, सदानंद हॉटेलकडून चौधरीवाडा परिसरातून मिरवणुकीची सांगता तेली पंचमढीजवळ झाली.तेली समाजाचा पारंपरिक व्यवसाय तेल घाण्यासाठी उपयोगात आणला जाणारा बैल व घाण्याचे प्रतिकात्मक चित्र मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले.
चाळीसगाव येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 18:19 IST
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाळीसगाव तेली पंच मंडळाच्यावीने अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सायंकाळी पाच वाजता घाटरोडवरील हॉटेल शिवनेरीपासून संताजी जगनाडे महाराजांची मिरवणूक काढण्यात आली.
चाळीसगाव येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक
ठळक मुद्देकाल्याच्या कीर्तनाचे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगतामिरवणुकीत समाजबांधव, लोकप्रतिनिधींसह मान्यवर सहभागीबैल व घाण्याचे प्रतिकात्मक चित्र मिरवणुकीत ठरले मुख्य आकर्षण