शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सुनील झंवरला फरार घोषित करण्याची प्रक्रिया संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:43 IST

जळगाव : बीएचआर प्रकरणात सुनील झंवर याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला ...

जळगाव : बीएचआर प्रकरणात सुनील झंवर याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला शरण आला असून सोमवारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तो न्यायालयाला शरण आल्याने अटकेची कारवाई करता आली नसल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुचिता खोकले यांनी ह्यलोकमतह्णला दिली. दरम्यान, फरार घोषित होण्याचे वॉरंटही न्यायालयाने रद्द केले आहे.बीएचआरमधील ठेवीदारांची फसवणूक व अपहारप्रकरणी पुण्याच्या विशेष न्यायालयाने मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारीला घोषणापत्र जारी केले होते. त्यानुसार तीस दिवसांच्या आत अर्थात १४ मार्चपर्यंत दोघा मुख्य संशयितांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वांरट काढण्यात आले होते. दरम्यान, पुढील आठवड्यात वॉरंटची मुदत संपुष्टात येऊन दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते. त्याचबरोबर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र, त्यापूर्वी सुनील झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला शरण आला आहे. त्याने वॉरंटही रद्द करून घेतले. मुंबई उच्च न्यायालयाने झंवर याला १८ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. झंवर हा न्यायालयाला शरण आल्याने तूर्तास अटकेची कारवाई टळली आहे. मात्र त्याला विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची संधी उच्च न्यायालयाने दिली आहे. शरण आल्याने मालमत्ता जप्तीचेही संकट टळले आहे.कंडारेचाही अटकपूर्व जामीन अर्जजितेंद्र कंडारे यालाही १४ मार्चपर्यंत शरण येण्याचे वॉरंट काढलेले आहे. त्यापूर्वी त्याने पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असून त्यावर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़. दरम्यान, सूरज झंवर यानेही मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर १० मार्चला निकाल होईल. संशयित विवेक ठाकरेच्याही जामीन अर्जावर २४ मार्च रोजी निकाल आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव