शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड तालुक्यातील येवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 14:58 IST

येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव जाणवत असल्याने रुग्णांचे व येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.

ठळक मुद्देसुविधांअभावी रुग्णांचे हालनिम्मा तालुका आरोग्य केंद्राला जोडलेला असतानाही सुविधा मिळणे होेते दुरापास्त

जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव जाणवत असल्याने रुग्णांचे व येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुमारे २८ गावे जोडली असून जवळपास निम्मा तालुका या प्राथमिक आरोग्य केंद्रास जोडला आहे. तरी या आरोग्य केंद्रात दूरवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा नसल्याने अनेक वेळा येथील वैद्यकीय अधिकारी हे बाहेरून औषध साठा घेण्याचा रुग्णांना सल्ला देतात. येथील रुग्णाच्या रक्त व लघवीचे नमुने हे तपासणीसाठी पाठविले असता ते १५-१५दिवस त्यांचे रिपोर्ट रुग्णालयात प्राप्त होत नसल्याने रुग्णांकडून अनेक वेळा तीव्र संताप व्यक्त होत आहे.तसेच या ठिकाणी गरोदर महिलांसाठी मानव विकास कार्यक्रम घेण्यात येतात. त्या महिलांना मध्यान्न भोजनाची व्यवस्था करण्यात येत. परंतु तोही सकस आहार मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा महिला करतात या भोजनाची व्यवस्था रुग्णालयाच्या अवारात उघड्यावर करण्यात येतात. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना शासनाच्यावतीने जी आर्थिक मदत मिळते ती मदत वर्ष उलटूनही मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी अनेकदा केलेल्या आहे व येथील महिलेने आर्थिक मदतीबाबत विचारणा केली असता त्या महिलेला टोलवाटोलवीची उत्तरे या महिलेस देण्यात येतात.याचबरोबर येथील रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी येतात तर त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करून येथील रुग्णालय परिसरात पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली आहे. या टाकीमध्ये अद्यापही पाण्याचा एक थेंबही टाकण्यात आला नाही व हजारो रुपये खर्च करून पाण्याचे आर.ओ.मशीन हे पाण्याअभावी धूळखात पडून आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे आहे त्या एकच वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहे. तेही या रुग्णालयात मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णाना रात्रीच्या वेळेस उपचार घेणे असल्यास रुग्णांना वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.रुग्णालयातील काही कर्मचारी ही मुख्यालयीन राहत नसल्याने व कार्यालयीन वेळेवर येत असल्याने रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा उडला आहे. गरोदर व प्रसूतीसाठीच्या महिलांसाठी शासनाच्यावतीने १०२ ही रुग्णवाहिका येथील रुग्णालयात कार्यरत असतानाही राजकीय दबावापोटी येथील रुग्णवाहिका मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आली. येवती प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना प्रसूतीसाठी खाजगी वाहनाचा वापर करावा लगतो. खासगी वाहनास जर अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न तालुका आरोग्य अधिकारी व येथील वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता ती आमची जबाबदारी नाही, असे सांगून जबाबदारी झटकली जाते, असा रुग्णांचा आरोप आहे. दरम्यान , या आरोग्य केंद्रातील समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून ‘जैसे थे’च आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यBodwadबोदवड