शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

अमळनेरात वीज ग्राहकांनी मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 14:43 IST

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे १ रोजी वीज ग्राहकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्देअमळनेरात कार्यशाळा समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- कार्यकारी अभियंता रमेश पवारवीज कंपनीत उल्लेखनीय सेवा करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा सत्कारआरएफ मीटर हे बिनचूकग्राहकांच्या आलेल्या लेखी समस्यांना उत्तरे देऊन कारवाई करण्याचे आश्वासन

अमळनेर, जि.जळगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे १ रोजी वीज ग्राहकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष मकसूद बोहरी अध्यक्षस्थानी होते. महावितरणचे धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा झाली. यात तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या मांडल्या. यावर समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कार्यकारी अभियंता पवार यांनी सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबराव पाटील, अमळनेर एमआयडीसीचे चेअरमन जगदीश चौधरी, अमळनेर महावितरणचे अभियंता कोलते, देशमुख, फुरसिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानशिव यांनी धावती भेट देऊन ग्राहक पंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना आदरांजली वाहण्यात आली.वीज कंपनीत उल्लेखनीय सेवा करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात श्याम पाटील, रवींद्र पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, विनायक भालेराव, लक्ष्मण सांगोरे, भागवत माने व हंसा कुर्वे, संध्या जाधव यांचा समावेश आहे.वीज ग्राहकांना मार्गदर्शन करताना पवार यानी आरएफ मीटर हे किती बिनचूक आहे याची माहिती दिली. वीज कंपनीतर्फे देण्यात येणाºया सुविधा, नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्राहकांच्या आलेल्या लेखी समस्यांना उत्तरे देऊन कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.यावेळी संघटनेचे तालुका संघटक राजेंद्र सुतार, सहसंघटक बापू चौधरी, सहसचिव योगेश पाने, महिला आघाडीप्रमुख अ‍ॅड.भारती अग्रवाल, करुणा सोनार, लता दुसाने तसेच कार्यकारी सदस्य सतीश मुंडके, ताहा बुकवाला, जयंतलाल वानखेडे, अनिल घासकडबी, खदिर सादिक, सुरेश पाटील, जितेंद्र चंद्रात्रे, मधुकरराव सोनार, चंद्रकांत लोहार, गणेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी महावितरण अमळनेर विभागाचे लेखाधिकारी अनिल ठाकूर, पालिकेचे अभियंता प्रशांत ठाकूर यांचा मकसूद बोहरी यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी, प्रास्ताविक सचिव विजय शुक्ल, पाहुण्यांचा परिचय ऊर्जामित्र सुनील वाघ यांनी करून दिला.

टॅग्स :consumerग्राहकAmalnerअमळनेर