शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याची समस्या पिकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:10 IST

भडगाव तालुक्यातील महिंदळेसह परिसरात वीज पुरवठा समस्येने उग्र स्वरुप धारण केले असून विहिरींना पाणी असतांनाही विजेअभावी ते पिकांंना देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकावर संकट घोंघावू लागले आहे.

ठळक मुद्देविजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत.

महिंदळे ता. भडगाव : महिंदळेसह परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन ते तीन दमदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील विहीरींना ब-यापैकी पाणी आहे. त्यामुळे परिसरात आजपर्यंत ज्वारी, बाजरी व कडधान्ये वगळता कपासी पिक जोमात आहे . परंतु विजेच्या लपंडावामुळे उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.चाळीसगाव तालुक्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती जाणवत असतांंना महिंदळे परिसरातील विहीरींना आजही ब-यापैकी पाणी आहे . परंतु विजेचा लपंडाव पाहता हा परिसरही संकटात येऊ शकतो, असे बोलले जात आहे.येथे सिंचनासाठी आठ तास वीज पुरवठा दिल्याचे सांगितले जाते, पण आठ तासात एक तासही वीज सुरळीत चालत नाही. परिणामी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ऐन बहरात आलेली पिके पाण्याअभावी डोळ्यासमोर मरणासन्न अवस्थेत उन्हांच्या झळा सहन करत आहेत.कमी दाबाचा वीज पुरवठापरिसरात भाद्रपदाचे कडक ऊन पडत आहे. उन्हाच्या तिव्रतेने पिकांची लाही लाही होत आहे. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करतांना दिसत आहेत. रात्री जिवाची पर्वा न करता पिकांना पाणी देण्यासाठी जातात. परंतु विजेचा लपंडाव व कमी दाबाचा पुरवठा यात पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक शेतक-यांचे पंप आजपर्यंत कमी दाबाच्या विज पुरवठ्यामुळे जळाले आहेत. आणि निकामी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने डिझेल इंजिनचा सहारा घेत आहेत, परंतु डिझेलचेही भाव वाढल्यामुळे हे परवडणारे नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी असा पेच शेतकºयांना पडला आहे.‘लाल्या’ रोग काढतोय डोके वरपरिसरात कापूस पिक जोमात असतांना भाद्रपदाच्या उन्हांची तीव्रता वाढत असल्याने व पाणी कमी असल्यामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण होताना दिसत आहे. जणू काही ‘दुष्काळात तेरावा महिना‘ अशी स्थिती अनुवभास येत आहे. अतोनात पैसा पिकांसाठी खर्च झाला आहे. त्यात वीज वितरणाचा कारभार शेतक-यांच्या मुळावर उठले आहे. दिवसभर विजेचा लपंडाव व कमी दाबाचा विज पुरवठ्यामुळे पिके कशी वाचतील या विवंचनेत शेतकरी आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे तर दुसरीकडे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील वीज समस्या त्वरीत सोडवावी व पिकांना जीवदान द्यावे, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

टॅग्स :Waterपाणी