शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
3
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
4
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
5
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
6
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
7
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
8
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
9
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
10
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
11
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
12
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
13
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
14
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
15
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
17
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
18
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
19
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
20
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची समस्या कायमच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 19:34 IST

वार्तापत्र-महसूल

सुशील देवकरकर्जमाफी होऊनही ‘सातबारा कोरा’ झालेला नसल्याने कर्जमाफीस पात्र शेतकरीही बँकेचे थकबाकीदार दिसत आहेत. आणि थकबाकीदाराला कर्ज न देण्याचे बँकांचे धोरण असल्याने यंदाच्या खरीप हंगामात या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नवीन पीककर्जापासून वंचीत रहावे लागण्याची भिती व्यक्त होत आहे. कारण अनेक महिन्यांपासून कर्जमाफीचा सुरू असलेला घोळ कायम असून तो लवकर मिटण्याची चिन्ह नाहीत. त्यातच कर्जमाफी जाहीर झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंतचे कर्जमाफी झालेल्या रक्कमेवरील व्याज शेतकºयांकडून न आकारण्याच्या शासनाच्या सूचनेमुळेही घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सातबारा कोरा करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या बियाणाचा, बोंडअळीचा विषय गंभीर आहे. यापूर्वी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. पालकमंत्र्यांनी तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बियाणांच्या विषयावर तर बैेठकीतूनच थेट कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. दुसºयाच दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी देऊनही त्याची चर्चाही बैठकीत झाली नाही. त्यानंतर शनिवार, ५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्यात पीककर्जाबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांनी पीककर्जाबाबतच्या नियोजनात पुढाकार घेण्याच्या सूचना करत जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर टाकली आहे. मात्र हा विषय धोरणात्मक असल्याने शासनाच्या ठोस आदेशांशिवाय जिल्हा बँका त्यावर अंमलबजावणी करण्याची शक्यता कमीच आहे. राष्टÑीयकृत बँकातर रिझर्व्ह बँकेच्या आदेशाशिवाय कोणताही आदेश पाळत नसल्याने शासनाचे आदेश केराच्या टोपलीत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात राष्टÑीयकृत बँकांकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी असूनही त्याकडे दूर्लक्ष होत आहे. याबाबत ९ किंवा १० मे रोजी जिल्हास्तरावर बैठक घेण्याचे जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले आहे. मात्र या बैठकीचा कितपत उपयोग होईल? याबाबत साशंकताचा आहे. जिल्हा बँकेने तर थकबाकीदार सोडाच ज्या शेतकºयांनी पूर्ण परतफेड केली आहे. त्या शेतकºयांनाही केवळ ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण निश्चित केले आहे. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने ठिय्या देत निधी उपलब्ध होईल, तसतसे पूर्ण कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्वासन घेतले असले तरी तो निव्वळ फार्स ठरणार असल्याचे दिसते. या सगळ्या घोळात शेतकºयांच्या मूळ समस्या मात्र कायमच आहेत. कपाशीच्या देशी वाणांचा प्रश्नही मिटलेला नाही. शासन, प्रशासन कुणालाच गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.