शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांची सुरक्षा ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:43 IST

पहूर, ता. जामनेर , जि.जळगाव : येथील रुग्णालयात येणाºया रुग्णांची तपासणी करताना सुरक्षा किटविना वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात ...

ठळक मुद्देसुरक्षा किटविना रुग्णालय आॅक्सिजनवरमागणी करूनही साहित्य मिळेना

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथील रुग्णालयात येणाºया रुग्णांची तपासणी करताना सुरक्षा किटविना वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा द्यावी लागत आहे. तसेच खासगी डॉक्टरही याला अपवाद नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाºयांसह खासगी खासगी डॉक्टरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन व सरकार गंभीरपणे उपाययोजना करीत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेपैकी वैद्यकीय सेवा प्रमुख मानली जाते. या सेवेची सुरक्षा धोक्यात आली तर हे भयंकर संकट मानले जाईल. तेच पहूर ग्रामीण रुग्णालय व खासगी डॉक्टरांच्या सुरक्षेवरून समोर आले आहे.येथील वैद्यकीय अधिकाºयांसह परिचारिका, अधिपरिचरिचारक व कर्मचारी रुग्ण सेवा पुरवित आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य विभागाने त्यांना सुरक्षा किट देणे बंधनकारक आहे. रुग्णाचा थेट संपर्क डॉक्टरांशी येत आहे. फक्त हँडग्लोज वापरून डॉक्टर प्रत्यक्ष तपासणी करीत आहे. एखाद्या रूग्णाला डॉक्टरांनी हात लावला नाही तर यातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. मात्र पंधरा दिवस उलटले असून अद्यापही सुरक्षा किटविना डॉक्टर सेवा देत आहे. विशेष म्हणजे सॅनिटायझर, स्पिरीट हात धुण्यासाठी नसून नाईलाजाने साबणाने हात धुत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा जीव वाचविणाºया डॉक्टरांसाठीच धोक्यात टाकणारा ठरू शकतो.संशयाने नागरिक भीतीच्या छायेतमुंबई व पुणे व अन्य बाहेर गावावरून आले आहे. त्यांच्याजवळ जावू नका, त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. ही मानसिकता नागरिकांची पहावयास मिळत आहे.सुरक्षा किट मिळण्यासाठी शासनस्तरावर मागणी केली आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर उपलब्ध नसल्याने आमच्यापर्यंत पोहोचली नाही. तरीही आमच्या स्तरावर सॅनिटायझर व मास लावून सुरक्षा घेतली जात आहे.-डॉ.हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय, पहूरशासनाकडून सुरक्षा किट मिळाले नाही व बाजारातही उपलब्ध नाही. सॅनिटायझर मिळत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने रूग्णसेवा बंद होती. मात्र माणुसकीच्या नात्याने स्वत:चा व परिवाराचा जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा पुरवित आहोत. रुग्ण तपासणीवरून रुग्णाचे नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमकीचे प्रसंग समोर येत आहे. नागरिकांनी डॉक्टरांना समजून घेणे आवश्यक आहे. -डॉ.जितेंद्र घोंगडे, खासगी डॉक्टर, पहूर 

टॅग्स :Healthआरोग्यJamnerजामनेर