शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

जळगावात प्रवाशांची सर्रास लूट, खाजगी आराम बसचे भाडे दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 12:58 IST

शासकीय आदेशाला केराची टोपली

ठळक मुद्देबसच्या भाड्यापेक्षा दुप्पटमोबाईलवरून मिळतात भाड्याचे दर

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागताच शहरातीलखाजगी आराम बसचे भाडे दुप्पट झालेअसूनप्रवाशांची सर्रास लूट सुरू झाली आहे. एरव्ही ४५० ते ५५० रुपये असलेले पुण्याचे भाडे आता ९०० ते एक हजार रुपयांवर पोहचले आहे. एसटी महामंडळाच्या भाड्यापेक्षाही हे भाडे दुप्पट असल्याने शासकीय आदेश धाब्यावर ठेवले जात असल्याचे ‘लोकमत’ने शनिवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान आढळून आले.सणवार, सुट्या काळात दरवर्षी खाजगी आराम बसचे भाडे अव्वाच्या सव्वा केलेजाते, या प्रकाराला आळा बसावा म्हणून शासनाने ही भाडेवाढ एसटी महामंडळाच्या बसेस्च्या भाड्यापेक्षा दीडपटपेक्षा जास्त नको असे आदेश काढले. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे जळगाव शहरात दिसून आले.सुट्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातून पुणे, मुंबई व इतर शहरात जाणाऱ्यांची तसेच येणाºयांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे खाजगी आराम बसच्या शहरातील काही कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भाड्याबाबत विचारणा केली असता आलेले अनुभव असे...शेवटच्या सीटसाठी ८४० तर पुढच्या सीटसाठी १०५० रुपयेस्टेडिअम परिसरातील एका खाजगी आराम बसच्या कार्यालयात पुणे येथे जायचे असून भाडे किती आहे, असे विचारले असता शनिवारचे भाडे ८४० रुपये एका प्रवाशासाठी होते. (ते देखील शेवटचे सीट शिल्लक असल्याने कमी झाले आहे, असेही सांगण्यात आले.) पुढचे सीट पाहिजे असे म्हटल्यावर, उद्या रविवार असल्याने एका प्रवाशासाठी १०५० रुपये लागतील, असे उत्तर मिळाले. मुंबईचे भाडे विचारले असता १२०० रुपये लागतील असे सांगण्यात आले.शेवटचे सीट आहे, ५० रुपये कमी करून देईलस्टेडिअम परिसरातील दुसºया एका कार्यालयात जाऊन विचारणा केली असता या ठिकाणी पुणे येथे जाण्यासाठी ९०० रुपये लागतील असे सांगण्यात आले. हे सीट वरचे (अप्पर) असल्याचीही माहिती त्यांनी दिली. दुसरे कोणतेही सीट शिल्लक नाही. तेथून माघारी परतत असताना शेवटचे सीट आहे, ५० रुपये कमी करून देतो असे सांगण्यात आले.मोबाईलवरून मिळतात भाड्याचे दरदुसºया एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात जाऊन पुण्याचे व मुंबईचे भाडे विचारले असता शनिवारसाठी पुण्याचे ९५० रुपये लागतील तर मुंबईचे भाडे १२०० रुपये लागतील असे सांगण्यात आले. रविवारचे भाडे विचारले असता मोबाईलवर पाहून भाडे सांगण्यात आले. इतर कंपनीच्या कार्यालयांमध्येही जाऊन विचारणा केली असता ९००, ९५०, एक हजार रुपये पुण्याचे भाडे असल्याची माहिती मिळाली.सिझन सुरू झाले, भाडे वाढणारचपुणे व मुंबईचे भाडे दुप्पट का? असे विचारले असता आता सिझन सुरू झाल्याने भाडेवाढ झाल्याचे सांगण्यात आले. पुणे येथून परतीचे भाडेही वाढले असून तेदेखील दुप्पटपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.बसच्या भाड्यापेक्षा दुप्पटसध्या एसटी महामंडळाच्या बसेस्चे जळगाव ते पुण्याचे भाडे ५०० रुपये आहे तर रातराणीचे भाडे ५५० रुपये आहे. शिवशाही बसचे भाडे ६४० रुपये आहे.परिवहन मंत्र्यांच्या आदेशाचे काय?सणवार, सुट्यांच्या काळात खाजगी आराम बसचे भाडे वाढविले तर दीडपट पेक्षा जास्त नको, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले असताना जळगावात मात्र दुप्पट भाडे आकारले जात आहे. त्यामुळे शासकीय आदेशाचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसJalgaonजळगाव