आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.४ : अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत शहरातील प्रितेश पलोड या विद्यार्थ्याने सर्वाधिक २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे़प्रितेश याने गणित या विषयात तर शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहे़ जेईई मेन् या परीक्षेत देखील ३६० पैकी २६० गुण मिळविले होते़अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती़ चैताली पाटील हिने १५८ गुण मिळविले आहे़ तर मोहित बाविस्कर याने १५७, हिमजा टेनी हिने १५४ व शर्वरी चौधरी हिने १४५ गुण मिळवून परीक्षेत यश प्राप्त केले आहे़ हे सर्व विद्यार्थी दिशा अकॅडमीचे आहेत़दरम्यान, या यशाबद्दल प्रितेशचा आई-वडीलांसह प्रा़ विकास परिहार, प्रा़ सतीश पुरोहित, चंद्रशेखर कासार, सतीश जाधव प्रा़ जावेद, प्रा़ विनय पाटील यांनी सत्कार केला़
सीईटी परीक्षेत जळगावचा प्रितेश पलोडचा राज्यात सहावा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:05 IST
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत शहरातील प्रितेश पलोड या विद्यार्थ्याने सर्वाधिक २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे़
सीईटी परीक्षेत जळगावचा प्रितेश पलोडचा राज्यात सहावा क्रमांक
ठळक मुद्देएमएचटी सीईटी परीक्षेचा शनिवारी निकाल जाहीरप्रितेश पलोड याला २०० पैकी १९० गुणगणित विषयात १०० पैकी १०० गुण