शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:55 IST

भुसावळ तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ८३४ लीटर दारू उद्ध्वस्त केली व एका आरोपीस अटक केली आहे,

ठळक मुद्देदोन हजार आठशे लीटर दारू उद्ध्वस्तदोन लाख २२ हजाराचा माल हस्तगतडी.वाय.एस.पी. राठोड व पो.नि.कुंभार यांची संयुक्त कारवाई

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ८३४ लीटर दारू उद्ध्वस्त केली व एका आरोपीस अटक केली आहे, तर एक बैलजोडी व बैलगाडीसह दोन लाख, २१ हजार ९०० रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई डी.वाय.एस.पी. गजानन राठोड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली तालुका व बाजारपेठ पोलिसांनी केली आहे.शिवपूर-कन्हाळा शिवारात अवैध गावठी दारूभट्टीचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी सहा ते ६.३० वाजेच्या सुमारास डी.वाय.एस.पी. राठोड, पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सापळा रचून ही कारवाई केली. यात नवसागर मिश्रित दोन हजार ६०० लीटर कच्चे रसायन, जळत्या भट्टीवरील गरम २०० लीटर रसायन व ३४ लीटर तयार दारू तसेच एक बैलजोडी व बैलगाडी, गूळ, मोह, नवसागर मिश्रित १५ ड्रम कच्चे रसायन असा दोन लाख २१ हजार ९०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत सुभान सुपडू गवळी यास अटक करण्यात आली.या पथकामध्ये तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुरेश वैद्य, प्रेमचंद सुरवाडे, गणेश सोनवणे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे फौजदार रवींद्र बिºहाडे, दीपक पाटील, गुलबक्षी तडवी, वाल्मीक सोनवणे, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण पो.कॉ. माळी आदी सहभागी होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ