शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गिरीश महाजन यांच्या दबावाने पोलीस अधिकाऱ्यांचा ‘फुटबॉल’ - आमदार किशोर पाटील यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:34 IST

शिवसेना पोलीस निरीक्षक किसन नजन पाटलांच्या पाठीशी

ठळक मुद्देभाजपा पदाधिकारी दम देताततर गुन्हेगार सुसाट सुटतील

जळगाव : जलसंपदा मंत्री फोन करतात आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे अधिकाºयांवर ठपका ठेऊन तडकाफडकी बदली करतात. जिल्ह्यात भाजपा नेत्यांनी अराजकता पसरवली असून मंत्री वरिष्ठांवर दबाव आणून पोलीस अधिका-यांचा फुटबॉल करीत आहेत. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पाठीशी शिवसेना उभी रहाणार असल्याची माहिती पाचो-याचे आमदार किशोर पाटील यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रपरिषदेला महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, किशोर भोसले, मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चोपड्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी चोपडा शहर व परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचा ठपका ठेऊन तडकाफडकी बदली केली. भाजपाच्या आजी, माजी शहराध्यक्षांनी किसन नजन पाटील यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी नजन पाटील यांची बदली करून त्यांची चौकशी करावी तसेच त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती.वाल्याचा वाल्मीकी करताय...शिवसेना दादागिरी खपवून घेणार नाहीचोपड्यातील पदाधिकाºयांवर गंभीर गुन्हे आहेत. हद्दपारीचे प्रस्ताव आहेत. मात्र भाजपा सध्या ‘वाल्यांना जमा करून वाल्मिकी’ करण्याचे प्रयत्न करीत आहेत.मात्र शिवसेना अशी दादागिरी खपवून घेणार नाही. किसन पाटील यांना पुन्हा चोपड्यात जायचे असल्यास त्यासाठीही प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.भाजपा पदाधिकारी दम देतातआमदार किशोर पाटील म्हणाले, भाजपाचे पदाधिकारी हे किसन पाटील यांना तुमची बदली करतो, निलंबित करतो अशी धमकी देतात. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रशासनावर दबाव आणतात.वास्तविक पोलीस अधीक्षकांनी दबावाला बळी न पडणाºया अधिकाºयांच्या पाठीशी उभे राहून त्यांची पाठ थोपटणे आवश्यक होते.मात्र त्यांनी दबावात येऊन पाटील यांची चोपड्याहून जळगावला मुख्यालयात बदली केली.तर गुन्हेगार सुसाट सुटतीलया प्रकाराने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हवालदिल झाले आहेत. या प्रकारातून गुन्हेगार सुसाट सुटतील. मंत्र्याच्या फोनमुळे जर बदली होणार असेल तर अधिकारी कर्मचारी कारवाई करण्याच्या फंदात पडणार नाहीत. शिंदे यांना आपला सल्ला आहे की, ते ज्या पद्धतीने अधिकाºयांवर ठपका ठेवत आहेत हा प्रकार म्हणजे त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेवर शंका व जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे, असे करू नका. आम्ही पिंपळगावचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्याबद्दल तक्रारी केल्या. शेवटी आंदोलन करावे लागले तेव्हा त्यांची बदली झाली. मात्र येथे केवळ मंत्री गिरीश महाजन हे फोन करताच अधिकाºयांचा फुटबॉल केला जातो.उदय वाघ व पदाधिकाºयांना सत्तेची मस्तीया परिस्थितीत शिवसेना किसन नजन पाटील यांच्या पाठीशी उभी रहाणार असल्याचे सांगून भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व अन्य पदाधिकाºयांना सत्तेची मस्ती आहे. याप्रश्नी आपण येत्या सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून त्यांना जाब विचारला जाईल तसेच मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार निवेदन दिले जाईल.चोपड्यात नागरिकांचे आंदोलन४पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या बदलीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी शनिवार सकाळी १० वाजेपासून शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यात नागरिकांसह शिवसेना, राष्टÑवादीचे नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दुपारी तहसीलदार दीपकसिंग गिरासे हे आंदोलनस्थळी आले. पाटील यांची बदली रद्द करावी या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.चोपड्याचे तिन्ही आरोपी कारागृहाऐवजी ‘सिव्हील’मध्ये४न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपाच्या तिनही पदाधिकाºयांना वैद्यकीय मदतीची गरज दाखवून सोयीनुसार जेलमध्ये न ठेवता सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे तर गिरीश महाजन यांचेच राज्य आहे. तेथे त्यांना बंदोबस्त मिळेल, डबे मिळतील यात शंका नाही. जेलरच्या चौकशीचीही आपण मागणी करणार असल्याचे किशोर पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव