शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात ६६ शोधनिबंध सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:56 IST

मराठी नाटक : आशय आणि रचना या विषयावर झाले मंथन

ठळक मुद्दे१९७५ नंतरचे मराठी नाटक : आशय आणि रचना’ या विषयावर चर्चासत्रराष्ट्रीय स्तरावरून १७८ मराठी विभागाच्या प्राध्यापकानी घेतला सहभागउच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतपारोळा, दि.१२ : किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने किसान महाविद्यालयात ‘१९७५ नंतरचे मराठी नाटक : आशय आणि रचना’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात ६६ शोधनिबंध सादर करण्यात आले.चर्चासत्राचे उद्घाटन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.केशव तुपे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील तर व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रवीण भोळे, अलिगढ विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.ताहीर पठाण, नासिक मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम मुल्यमापन विभागाचे प्रमुख प्रा.सुरेश पाटील, जि.प.सदस्य रोहन पवार, संचालक अशोक पाटील, प्रा.प्रभा पवार, प्राचार्य डॉ.वाय.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.एच.सोनवणे, प्रा.सुभाष शेलार, प्रा.एन.बी.पाटील, प्रा.डॉ.आशुतोष पाटील, प्रा.डॉ.संजय शिंदे, प्रा.डॉ. शिरीष पाटील उपस्थित होते. या वेळी प्रा.डॉ.माणिक बागले यांच्या ‘१९७५ नंतरचे मराठी नाटक आशय आणि रचना’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.चर्चासत्रात राष्ट्रीय स्तरावरून १७८ मराठी विभागाचे प्राध्यापकानी सहभाग नोंदवला. ६६ शोध निबंध सादर करण्यात आले होते. डॉ.केशव तुपे म्हणाले की, नाट्यकलेला महाराष्ट्रच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात एक प्रदीर्घ परंपरा व वेगळे स्थान आहे. मराठी माणूस हा नाट्यवेडा म्हणूनच ओळखला जातो. मराठी नाटक आशय आणि रचना या विषयावर आयोजित महाविद्यालयातील चर्चासत्र गेल्या ५० वर्षातील मराठी नाटक व रंगभूमीवर एक मौलिक चर्चा घडून आली असे त्यांनी सांगितले.या चर्चा सत्रात गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटकसह नासिक, मुंबई, पुणे, अमरावती, वर्धा, नागपूर, सोलापूर, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, बारामती, सांगली, सातारा, बीड, उस्मानाबाद, लातूर येथील प्राध्यापक उपस्थित होते. या चर्चासत्राच्या निमित्ताने मराठी साहित्य कादंबरी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा.एम.बी.बाविस्कर व प्रा.डॉ.प्रदीप औजेकर यांनी तर आभार प्रा.जी.एच.सोनवणे यांनी मानले.

टॅग्स :ParolaपारोळाJalgaonजळगावeducationशैक्षणिक