शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील गरोदर माहेरवासीन संशयास्पदरित्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 18:05 IST

सासरच्या मंडळींवर व्यक्त केला नातेवाईकांनी संशय

ठळक मुद्देविवाहितेने दिली होती आई, वडीलांना धोक्याची माहितीनातेवाईकांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेटनातेवाईकांनी व्यक्त केला सासरच्या मंडळींवर संशय

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ : सुप्रीम कॉलनी येथील माहेर असलेली सुमैय्या हारुण खाटीक (वय २४) ही आठ महिन्याची गरोदर विवाहिता तिच्या अडीच वर्षाच्या मुलीसह बेटावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे येथून २६ मार्चपासून गायब झालेली आहे. या प्रकरणात सासरच्या मंडळींवरच संशय असून त्यानी तिचे बरेवाईट केले असावे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, या प्रकरणाची सखोल व तांत्रिक माहितीच्या आधारावर चौकशी करण्यात यावी यासाठी नातेवाईक अक्रम अब्बास खाटीक व अन्य नातेवाईकांनी मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांची भेट घेतली. याबाबतची एक तक्रार नातेवाईकांनी धुळे पोलीस अधीक्षकांकडे देखील केली आहे. संशय येऊ नये यासाठी पतीने पत्नी हरविल्याची तक्रार नरडाणा पोलिसात केली आहे. या तक्रारीनंतर पतीची वागणूक संशयास्पद असल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.आई, वडीलांना दिली धोक्याची माहितीसुमैय्या हिचे हारुण खाटीक याच्याशी लग्न चार वर्षापूर्वी सुप्रीम कॉलनीत झाले होते. लग्नात मानपान नाही, हुंडा कमी दिला.त्यातच तू मुलीला जन्म दिला या सारख्या अनेक कारणांनी सुमैय्या हिचा सासरच्याकडून छळ होत होता. या दरम्यान त्यांच्याकडून बरेवाईट करण्याची धमकीही दिली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेता सुमैय्या हिने २६ मार्च रोजी जळगावला आई, वडीलांना फोन करुन धोक्याची माहिती दिली. घाबरलेल्या पालकांनी लागलीच त्याच दिवशी बेटावद गाठले असता मुलगी घरी नव्हती. ती कुठे तरी निघून गेली असे सांगण्यात आले. त्या दिवसापासून मुलगी घरी नसल्याने तिचे बरेवाईट झाले असावे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पतीने नरडाणा पोलिसात पत्नी हरविल्याची नोंद केली. त्यानंतर तिचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही असे अक्रम खाटीक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWomenमहिला