शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

निकालाच्या वेळेपेक्षा अचूकतेला प्राधान्य - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:54 IST

अंतिम निकालाच्या अंदाजाची वेळ सांगणे अशक्य

जळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन किती वाजेपर्यंत अंतिम निकाल येईल हे सांगणे अशक्य असून घाईघाईत कमी वेळेत निकाल देण्यापेक्षा अचूक निकाल देण्यास प्राधान्य राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. दरम्यान, पारदर्शकतेसाठी मतमोजणी ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येकाची तीन ठिकाणी तपासणी केली जाणार असून मतमोजणीच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरास पूर्णपणे बंदी राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.या वेळी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सर्वप्रथम सर्व्हीस व्होटर, पोस्टल बॅलेट यांची तपासणी होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी होईल व मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले.वेळ सांगण्यास नकारनिकाल किती वाजता स्पष्ट होईल, या बाबत विचारणी केला असता, वेळ सांगणे अशक्य असून तसा अंदाज जरी सांगितला तरी त्याचा कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेपेक्षा अचूक मतमोजणीवर आपला भर असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.तीन ठिकाणी होणार तपासणीमतमोजणी ठिकाणी जाताना प्रत्येकाची तीन ठिकाणी तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पारदर्शकतेसाठी ही दक्षता घेतली जात असल्याचे ते म्हणाले.मोबाईल आढळल्यास गुन्हा दाखल करणारमतमोजणी ठिकाणी १०० मीटर परिसरात कोणालाही मोबाईल वापरण्यास बंदी राहणार असून कोणाकडे मोबाईल आढळल्यास तो जप्त करण्यात येऊन संबंधितास बाहेर काढण्यात येऊन त्यास पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला.प्रत्येक फेरीनंतर आज्ञावलीत भरणार माहितीप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जळगाव शहर-२९, जळगाव ग्रामीण-२४, अमळनेर-२३, एरंडोल-२१, चाळीसगाव-२५ व पाचोरा-२४ तर रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा-२३, रावेर-२३, भुसावळ-२३, जामनेर-२४, मुक्ताईनगर-२३, मलकापूर-२२ फेºयांमध्ये मतमोजणी होणार आहे.मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार आहे. मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्यक असेल, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.मतमोजणीच्या परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पोलीस विभागामार्फत ठेवण्यात आला आहे. परिसरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचारी यांचे वाहनासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना निकालाची माहिती मिळावी यासाठी परिसरात लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी सांगितले.मतमोजणी ठिकाणी गेल्यावर समजणार टेबलमतमोजणी कर्मचाºयांना २२ रोजी पुन्हा विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार असून मतमोजणी ठिकाणी पोहचल्यानंतरच कर्मचाºयांना कोणत्या टेबलवर काम करायचे आहे, हे समजणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव