शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

Jalgaon: पालकमंत्र्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे ‘भावी आमदार’ म्हणून लागले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

By ajay.patil | Updated: April 27, 2023 14:21 IST

Gulabrao Patil: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.

- अजय पाटील

जळगाव  - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव व पाळधी दरम्यान अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर प्रताप पाटील यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. समर्थकांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर प्रताप पाटलांचा भावी आमदार उल्लेख झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

प्रताप पाटलांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या या बॅनरची चर्चा जळगाव ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर हे बॅनर लागले आहेत. जर प्रताप पाटील हे भावी आमदार असतील तर ते आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार की मग विधानपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत. यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्याऐवजी प्रताप पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल का ? यासंदर्भात चर्चा रंगली आहे. प्रताप पाटील यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल अशी ही मध्यंतरी चर्चा होती. त्यानंतर आता ‘भावी आमदार’ म्हणून प्रताप पाटलांचे बॅनर लागल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल की ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये निवडणूक लढवणार, याची चर्चा रंगली आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांची आगामी काळात भूमिका काय राहील याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.

सोशल मीडियावर चर्चा सुरु..अनेकांनी पाळधी जवळील महामार्गालगत लावण्यात आलेल्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर अनेकांच्या व्हॉट्सॲप  इन्स्टाग्राम, फेसबूकच्या स्टेटस लगत देखील प्रताप पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केला जात आहे. जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर आतापर्यंत माजी आमदार ओंकार वाघ यांचे पुत्र दिलीप वाघ हे आमदार झाले. माजी खासदार  ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनिष जैन हे विधानपरिषदेतून आमदार झाले. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसे सध्या रावेर लोकसभेच्या खासदार आहेत. त्यामुळे हाच कित्ता पालकमंत्र्यांनी गिरवला, तर विधानपरिषदेसाठी प्रताप पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रताप पाटील आधीच जिल्हा परिषद सदस्य होते, त्यामुळे ते आधीच राजकारणात असल्याने आगामी काळात मोठी संधी मिळण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव