शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लोभामुळे गमावला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:40 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘संस्कार दीप’ या सदरात शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत लिहिताहेत बोधकथा...

एका अरण्यात एक भिल्ल राहत असे. तो शूर, धैर्यशील व श्रेष्ठ धनुर्धर होता. शिकार करूनच तो आपले जीवन व्यतीत करीत होता. त्याच्या कुटुंबाचे भरणपोषणही शिकारीवरच होत होते. अनेकदा तो आवश्यकतेपेक्षा अधिक शिकार करायचा. मग त्याला मीठमिरचीला दोन पैसे मिळत.एका दिवशी शिकार करून तो घरी परतण्याच्या बेतात होता. तशी तो तयारी करीत होता. बांधाबांध झाली होतीच. तेवढ्यात त्याला एक मोठ्या शरीराचे जंगली डुक्कर दिसले. याची शिकार झाली, तर अधिक फायदा होईल असा त्याने विचार केला. त्याने भात्यातून एक तीक्ष्ण बाण काढला. त्या डुकरावर नेम धरून बाण मारला. त्याच्यावर जबर प्रहार झाला. डुक्कर घायाळ झाले. पण त्वरित मेले नाही. उलट त्या डुकराने भिल्लावर आक्रमण केले. त्याचे पोट फाडून त्याला मारले. थोड्या वेळाने ते जखमी डुक्करही तेथेच मरून पडले.तेवढ्यात एक कोल्हा येथे आला. तो खूप भुकेला होता. डुक्कर व भिल्ल दोघांना मेलेले त्याने बघितले. भिल्लाने आधी केलेली एका प्राण्याची शिकारही तेथेच बाजूला ठेवलेली होती. माझं भाग्य फार चागलं आहे, असा त्याने मनाशी विचार केला. मी आता याचा हळूहळू उपयोग करीन पुष्कळ दिवस हे खाद्य मला उपयोगी पडेल.मग तो मूर्ख कोल्हा सर्वात आधी तेथे पडलेल्या धनुष्याची तांत खाऊ लागला. थोड्याच वेळात तांत तुटली. त्यामुळे धनुष्याचा अग्रभाग अत्यंत वेगानं त्याच्या तोंडात आपटला. कोल्ह्याचे डोके फोडूनच तो धनुष्याचा अग्रभाग बाहेर पडला. लोभानं कोल्ह्याचा मृत्यू झाला.तात्पर्य : लोभ धरू नये.-प्रा.डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव