शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथे वाणी युवा मंचतर्फे गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:26 IST

महाराष्ट्र वाणी युवा मंचमार्फत वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कन्यारत्नप्राप्त दाम्पत्यांचा सत्कार व पालकांसाठी प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे करिअर मार्गदर्शन व करियर शंका समाधानाचा कार्यक्रम झाला.

ठळक मुद्देकन्यारत्न प्राप्त दाम्पत्यांचा सत्कारपालकांसाठी करिअर मार्गदर्शन

पाचोरा, जि.जळगाव : महाराष्ट्र वाणी युवा मंचमार्फत वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कन्यारत्नप्राप्त दाम्पत्यांचा सत्कार व पालकांसाठी प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे करिअर मार्गदर्शन व करियर शंका समाधानाचा कार्यक्रम झाला. उपनगराध्यक्ष शरद पाटे अध्यक्षस्थानी होते.राजीव गांधी टाऊन हॉलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन चाळीसगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर यांनी केले. जळगावचे उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर, डोंबिवलीचे राजेंद्र सिनकर, प्रा.राजेंद्र चिंचोले, अजित कुडे, डॉ.शरद वाणी, प्रा.डी.पी.वाणी, व्यंकटेश वाणी, अशोक वाणी, ज्ञानेश्वर कोतकर, चंद्रकांत कोतकर, संजय वाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी जिल्ह्यातून दहावी सीबीएससी माध्यमातून प्रथम आलेल्या यश ज्ञानेश्वर कोतकर व नाशिक येथे गुन्हेगारी निर्मूलनात विशेष कामगिरी बजाविणारे दीपक वाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर कोतकर व सचिन येवले यांचा सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदवी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी करिअर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता, आवड ओळखून करिअर निवडावे, असा सल्ला प्रा.चिंचोले यांनी दिला. डॉ.विनोद कोतकर यांनी आईचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा वापर करून यशोशिखर गाठावे, अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शरद पाटे, प्रकाश मोराणकर, अजित कुडे, राजेंद्र सिनकर, डॉ.शरद वाणी, प्रा.डी.पी. वाणी, व्यंकटेश वाणी यांची भाषणे झाली.प्रास्ताविक युवा मंचचे अध्यक्ष संदीप महालपुरे यांनी केले. याप्रसंगी विजय सोनजे, विशाल ब्राह्मणकार, अशोक बागड, सुनील कोतकर, योगेश शेंडे, प्रा.लक्ष्मण शिनकर, रमेश महालपुरे, प्रवीण शेंडे, प्रकाश येवले , किरण अमृतकर, गणेश सिनकर, महेंद्र महालपुरे, संदीप शिनकर, विवेक ब्राह्मणकर, हर्षल माकडे व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमात विवेकानंद मंडळ डोंबिवलीमार्फत गरीब विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली. सूत्रसंचालन चंद्रकांत कोतकर, डी.आर. कोतकर, योगेश शेंडे, प्रा.सिनकर यांनी केले. विजय सोनजे यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा