शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव येथे सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:58 IST

धरणगाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

धरणगाव, जि.जळगाव : येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर महंत भगवान महाराज होते.प्रास्ताविक के.आर. वाघ यांनी केले. प्रमुख अतिथी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन, माजी आमदार हरीभाऊ महाजन होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन व पंच मंडळाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दहावी, बारावी, पदवीप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘महात्मा जोतिराव फुले चरित्र, सावित्रीमाई फुले, डॉ.बाबासाहेब ग्रंथ, प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, आर.डी.महाजन यांनी गुणवंत विद्याथ्यार्ना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा देऊन धरणगावचे व माळी समाजाचे नाव मोठे करा, असा संदेश दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत भगवान बाबा यांनी शिका मोठे व्हा, आई-वडिलांचा मान -सन्मान करा. गुरूजनांचा आदर करा असा संदेश दिला.सूत्रसंचालन व्ही.टी. माळी, पी. डी. पाटील, हेमंत माळी यांनी, तर आभार व्ही.टी. माळी यांनी मानले. कार्यक्रमास माळी समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन , योगराज महाजन, सचिव दशरथ महाजन, डिगंबर महाजन, विजय महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी , हेमंत माळी, कैलास माळी, रमेश महाजन, आर.डी.महाजन ,पी.डी. पाटील, नीतेश महाजन व समस्त माळी समाज बांधव, पालक विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकDharangaonधरणगाव