शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

प्रदीप रायसोनी, चौधरींसह सहा जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:54 IST

विमानतळ प्रकरण

ठळक मुद्दे सिंधू कोल्हेंना समन्स; जनतेच्या पैशाचा गैरवापर

जळगाव : विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी गुरुवारी न्या.बी.डी.गोरे यांनी तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांच्यासह सहा जणांना प्रत्येकी २० हजाराचा जातमुचलका व २० हजार रुपयांचा रोख बॉँड यावर जामीन मंजूर केला. सिंधू विजय कोल्हे या गैरहजर असल्याने न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे समन्स बजावले.तत्कालिन नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना ३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिल्यावरुन २०१२ मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५, गु.र.नं.११०/२०१२ भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. माजी मंत्री सुरेशदादा जैन, तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीप ग्यानचंद रायसोनी, नगराध्यक्ष सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अ‍ॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत यांच्यासह ठरावावर सह्या करणाऱ्या नगरसेवकांविरुध्द हा गुन्हा दाखल झाला होता. यातील सुरेशदादा जैन व नगरसेवक वगळता वरिल सात जणांविरुध्द पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांना एक आठवडा आधीच जामीनदारासह न्यायालयात हजर राहण्याबाबतसमजपत्र बजावले होते. त्यानुसार मागील तारखेस चत्रभूज सोनवणे, माजी मुख्याधिकारी पंढरीनाथ काळे व धनंजय जावळीकर न्यायालयात उपस्थित होते, मात्र तेव्हा त्यांनी तारीख मागून घेतली होती. त्यानुसार १४ रोजी उपस्थित राहण्याचे न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे गुरुवारी सिंधू कोल्हे वगळता सर्व सहा संशयित न्यायालयात हजर झाले. दरम्यान वाघूर प्रकरण प्रकरणात नरेंद्र भास्कर पाटील यांच्यावतीने त्यांचे भाऊ विजय भास्कर पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वाघूर, विमानतळ व जिल्हा बॅँक प्रकरणाचा तपास राजकीय दबावाखाली होत असून चौकशी अधिकाºयांनी शिक्षेचे कलम वगळले आहे. तपासातही दिरंगाई होत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणात २८ रोजी न्या.एस.एस.शिंदे यांच्या खंडपीठात कामकाज होणार आहे. त्यादिवशी तपासाधिकाºयांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, वाघूर प्रकरणात १९९९ ते २०१० या कालावधीत ठरावाला मतदान करणारे नगरसेवक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. सुरेशदादा जैन यांच्या बॅँक खात्यात ९ कोटी रुपये धनादेशाने जमा झालेले आहेत, असे असताना जैन यांच्यासह नगरसेवकांना का वगळले असेही याचिकेत म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालय