शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

आयुष्यातील जगणे सुंदर करण्याची ताकद कलेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:45 IST

एकाकींका स्पर्धा : जेष्ठ रंगकमी व साहित्यिक प्रा़ अनिल सोनार यांचे प्रतिपादन

जळगाव : शब्द आणि संवाद हे अभिनयाचे महत्वाचे अंग आहे. आयुष्यातील जगणे सुंदर करण्याची ताकद कलेत आहे. जीवनातील अस्वस्थ्यता नाटकातून मांडता येते. हेच काम नूतन मराठा महाविद्यालयाच्या हलगी सम्राट मधून दिसून आले आहे, असे प्रतिपादन धुळे येथील जेष्ठ रंगकर्मी व साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांनी केले.नूतन मराठा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते़ सकाळी १० वाजता प्रा. अनिल सोनार यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर होते. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जजीमविप्र संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ काटकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख उपस्थित होते.नाट्यक्षेत्रातील प्रगतीचे मापन एकांकिका स्पर्धेतूनच समजतयशाला अंतिम पायरी नाही. नाट्यक्षेत्रातील प्रगतीचे मापन एकांकिका स्पर्धेतूनच समजते. कला अफाट सागरासारखा असून कला क्षेत्रातील व्यक्तीने सतत शिकत राहिले पाहिजे. काळानुसार नाटके निर्माण करणे गरजेचे असून स्वत:ला प्रगल्भ करीत राहावे. स्वल्पविराम, प्रश्न, सूचना नाटक सादर करताना गरजेचे आहे, असे प्रा़ अनिल सोनार यांनी सांगितले़ आयुष्यात आपल्याला काय व्हायचे आहे हे महत्वाचे आहे, असेही प्रा.सोनार म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्रा.माहुलीकर यांनी विद्यार्थ्यांना स्व-परीक्षणासाठी स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगितले.सोनार यांचा विशेष सत्कारस्पर्धेच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. नटराज पूजन करून दीपप्रज्वालन करीत स्पर्धेचे उद्घाटन घंटानाद करून झाले. प्रस्तावनेत प्राचार्य डॉ. देशमुख यांनी, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून अशा स्पर्धांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.अनिल सोनार यांचा पंचाहत्तरीनिमित्त सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. प्रा.पंकजकुमार ननवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यापीठ संयोजन समिती सदस्य प्रा.शाम सोनवणे, प्रा. खेमराज पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी मानले. स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पी.आर.बागुल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.राहुल संदानशिव, प्रा.घनश्याम पाटील आदींनी परिश्रम घेतले.एकांकीकातून सामाजिक प्रश्नांची मांडणीउद्घाटनानंतर लगेचच एकांकिका सादर झाल्या. यात डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाची शाली मध्ये नाट्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाºा शालीची कहाणी दिग्दर्शिका काजल तायडे यांनी मांडली आहे. यावेळी शालिनी कोळी हिने उभारलेल्या शालीह्वला दाद मिळाली.धनश्री जोशी लिखित नाहाटा महाविद्यालय येथील चिमणी एकांकिका दीपनगरच्या औष्णिक विद्युत केंद्रावर आधारित होती. औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीची राख शेतकऱ्यांच्या शेतात पडून त्यांना व त्यांच्या परिवाराला किती त्रास होत आहे याचे चित्रण यात मांडण्यात आले आहे. बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची लाल चिखल, चोपडा महाविद्यालयाची रंगबावरी,एमएसव्ही महाविद्यालयधुळेची एक रात्र वैऱ्यांची या पाच एकांकिका सादर झाल्या.पारितोषिक वितरणस्पधेर्नंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्यासह परीक्षक पुणे येथील नितीन धनधुके, भुसावळ येथील अनिल कोष्टी, जळगावच्या मंजुषा भिडे उपस्थित होते.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव