शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

प्रात्यक्षिकातून जाणून घेतली उर्जानिर्मिती प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:14 IST

कार्यशाळा : प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन

ठळक मुद्देधनाजी नाना चौधरी महाविद्यालयात कार्यशाळा१०० विद्यार्थ्यांचा सहभागप्रात्यक्षिकाचा विद्यार्थ्यांनीही लुटला आनंद

जळगाव- केसीई अभियांत्रिकीच्या सीआरएसच्यावतीने ‘अपारंपारिक उर्जा, कौशल्य विकास आणि करिअर’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळा नुकतीय खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडली. या कार्यशाळेत प्राध्यापकांनी प्रात्यक्षिकातून अपारंपारिक उर्जेचे विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले तर उर्जा निर्मितीची प्रक्रियाही प्रात्यक्षिकातून समजावून सांगितली.

या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बोरोले, केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. राजेश वाघुळदे, प्रा. लीना वाघुळदे, प्रा.धीरज पाटील, प्रा.सचिन सोनवणे, मेनका चौधरी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम बोरोले यांनी केले. त्यात त्यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांना भविष्यात नवी दिशा देण्याचे काम नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, असे सांगितले. नंतर प्रा. वाघुळदे यांनी कार्यशाळेची रूपरेषा, महत्व आणि उर्जा बचतीचे महत्व विषद केले. तर प्रा. सचिन सोनवणे यांनी कौशल्य विकासाचे विविध पैलू, भावनिक कौशल्य, विविध कोर्सेस बद्दल माहिती दिली.प्रात्यक्षिकातून दिली माहितीदुपारच्या द्वितीय सत्रात अपारंपारिक उर्जेचे महत्व, उर्जा निर्मिती प्रक्रिया या विषयी प्रा. धीरज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सोलर प्लेटच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून उर्जेची निर्मिती तसेच त्याचे महत्व प्रा. राजेश वाघुळदे यांनी पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुध्दा प्रात्यक्षिकाचा आनंद घेतला. शेवटच्या सत्रात प्रा. लीन वाघुळदे यांनी दहावी व बारावी नंतर पुढे काय अणि पुढील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर विकास पाटील आणि स्मिता इंगळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार हेमलता चौधरी यांनी केले. तब्बल १०० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला होता़ यशस्वीतेसाठी प्रा. डी.आर. फेगडे, मेनका चौधरी, पी.एन.ख़वले, प्रमोद महाजन, नरेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव