शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या सुधारित सेवा शुल्कवाढीस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:01 IST

वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी कायम

जळगाव : आधीच मंदीच्या झळा सोसणाऱ्या तसेच वीज दरवाढ व इतर करांच्या बोझाखाली असलेल्या उद्योगांच्या सेवा शुल्कात साडे चार रुपये प्रती चौरस मीटरवरून थेट १३ रुपये प्रती चौरस मीटर (प्रती वर्ष) अशा भरमसाठ करण्यात आलेल्या सेवा शुल्क वाढीला स्थगिती देण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हिवाळी अधिवेशनात केल्याची माहिती जळगाव जिल्हा इंडस्ट्रीज्् असोसिएशनला (जिंदा) दिली.या मुळे सध्या दिलासा मिळाला असला तरी सेवा शुल्कातील ही भरमसाठ वाढ रद्द करण्यात येऊन नियमानुसार जी वाढ असेल ती करावा, या मागणीवर उद्योजक ठाम आहे. दरम्यान, या संदर्भात ‘लोकमत’ने १७ डिसेंबर रोजी ‘उद्योगांच्या सेवा शुल्कात भरमसाठ वाढ’ या मथळ््याखाली वृत्तदेखील प्रकाशित केले होते.औद्योगिक वसाहत परिसरात सुविधांसाठी उद्योजकांकडून सेवा शुल्क आकारले जाते. २००८पासून सुरू झालेल्या या कराचा दर २०१५पर्यंत दीड रुपया प्रती चौरस मीटर (प्रती वर्ष) होते. २०१६मध्ये ते साडेचार रुपये झाले. त्यानंतर आता नोव्हेंबर २०१९पासून हे शुल्क थेट १३ रुपये प्रती चौरस मीटर (प्रती वर्ष) करण्यात आले. ही वाढ पाहता चार वर्षात थेट ९ पटीने झाली. या भरमसाठ वाढीने उद्योजक संतप्त झाले व त्यांनी या संदर्भात ‘जिंदा’च्यावतीने ही वाढ रद्द करण्याची मागणी केली होती व तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील उद्योजकांनी दिला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशीही संपर्क साधून उद्योगांची स्थिती लक्षात आणून दिली होती.उद्योजकांची मागणी तसेच सद्य:स्थितीतील आर्थिक व औद्योगिक परिस्थितीचा विचार करीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ११ नोव्हेंबर २०१९ च्या परिपत्रकानुसार वाढविण्यात आलेल्या सेवा शुल्क आदेशास स्थगिती देण्यात आली. यासंदर्भात शासनस्तरावर फेरविचार करण्यात येईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषद व विधानसभेत सांगितल्याची माहिती उद्योजकांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव