शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:01 IST

भुसावळ : जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करत आरोपीला अटक करावी या फिर्यादीच्या याचिकेवकर ...

भुसावळ : जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करत आरोपीला अटक करावी या फिर्यादीच्या याचिकेवकर उच्च न्यायालयाने तसे आदेश दिले होते. मात्र आरोपीच्या अटकेसंदर्भातील अधिकार हा तपासयंत्रणेचा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली आहे.याप्रकरणी हेतूपुरस्कर मुख्य आरोपी विवेक पारसकर यांना अटक करत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीत तपास व्हावा व पारसकर यांना अटक करावी, अशी याचिका औरंगाबाद उच्च न्यायालायात बियाणी यांनी दाखल केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पारसकर यांना तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत पोलीस उप.अधीक्षक राठोड यांचा लेखी खुलासा मागवला. तसेच ते हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर उपाधीक्षक राठोड यांनी विवेक पारसकर यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु केले.सदर आदेशाविरुद्ध पारसकर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केले. पारस्कर यांची बाजू अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी मांडली. त्यांनी सर्वोच्च न्यायालया पुढे युक्तिवाद केला की, एखाद्या आरोपीला अटक करायचे की नाही याचे संपूर्ण अधिकार हे तपास यंत्रणेला असतात. संबंधित आरोपी कागदोपत्री पुरावे हे तपास अधिकारी यांना उपलब्ध करून देत असेल आणि अशा स्थितीत जर तपास यंत्रणेला त्या आरोपीला अटक करण्याची गरज वाटत नसेल तर त्यात काहीही वावगे नाही. त्यांनी यासंदर्भातले न्यायनिवाडे सादर असता सर्वोच्च न्यायालयाने (न्या.डी.वाय.चंद्रचूड व ऋषिकेष रॉय) उच्च न्यायालयाच्या तिन्ही आदेशांना स्थगिती दिली.४येथील माजी नगरसेवक आणि व्यावसायिक मनोज बियाणी यांनी २०१८ मध्ये भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला माजी आयपीएस सुनील पारसकर यांचे बंधू विवेक पारासकर यांच्याविरुद्ध २०१५ ला तक्रार दिली. यात खोटा ७/१२ उतारा दाखवून खडके शिवारात अस्तित्वात नसलेली जमीन विकण्याचा सौदा करून ईसार पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ९० लाख रुपये रोख घेतले. परंतु दिलेल्या मुदतीत खरेदी करून दिली नाही, या फिर्यादीवरुन उमेश राठी आणि विवेक पारस्कर यांच्याविरुद्ध बियाणी यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव