शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिस्टर वापरामुळे कापसाच्या मागणीवर परिणामाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 07:26 IST

अतुल गणत्रा यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमेरिकेत दुष्काळ व पाकिस्तानमध्ये आलेल्या महापुरामुळे या दोन्ही देशांमधील कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने, भारतीय कापसाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे कापसाचे दर खूप वाढतील अशीही शक्यता नाही. कारण कापसाचे दर वाढल्यामुळे देशातील अनेक स्पिनींग मिल उद्योजकांनी कापसाऐवजी पॉलीस्टरचा वापर वाढवला आहे. त्यामुळे देशातंर्गत मागणीत घट होईल. हे दर हमीभावापेक्षा जास्तच असले तरी ते खूप असण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी दिली आहे. 

यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची स्थिती कशी राहील, याबाबत मंथन करण्यासाठी रविवारी जैन हिल्सवरील सभागृहात ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी समारोपीय भाषणात गणत्रा बोलत होते. या कार्यक्रमात बजाज स्टिलचे ललित कलंत्री,  महाराष्ट्र जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, टेक्साईल्स कमीश्नर उषा पोळ, सीसीआयचे अर्जुन दवे, खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांच्यासह देशभरातील जिनर्स, व्यापारी व काही शेतकरीदेखील उपस्थित होते.

देशात ३.६५ कोटी गाठींचे उत्पादन शक्यभारतात एकूण ३ कोटी ६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता गणत्रा यांनी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे उत्पन्नात २० ते २५ लाख गाठींचे उत्पादन घटण्याचा अंदाजही व्यक्त केला. सरकीचीही मागणी घटली आहे.

बांगलादेशात निर्यात करताना काळजी घ्या अमेरिकेत दुष्काळ, पाकिस्तानात महापूर यामुळे या दोन्ही देशांमधील कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढेल. मुख्य निर्यातदार देशांमध्ये बांगलादेशाचा समावेश आहे. मात्र, बांगलादेशात आर्थिक मंदी असल्याने या देशात निर्यात करताना काळजी घ्या, असे आवाहन वक्त्यांनी जिनर्स व व्यापाऱ्यांना केले. 

टॅग्स :cottonकापूसJalgaonजळगाव