शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चिक निधीवरून जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 11:37 IST

जळगाव : जिल्ह्याचा २०२०-२०२१चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी २० जानेवारी रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक अखर्चिक निधीवरून ...

जळगाव : जिल्ह्याचा २०२०-२०२१चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी २० जानेवारी रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक अखर्चिक निधीवरून गाजण्याची शक्यता आहे. या सोबतच रखडलेले चौपदरीकरण, शिधा पत्रीकाद्वारे न मिळणारे धान्य, जळगाव विमान सेवेच्या अडचणीसह विविध विषयांवरुनही ही बैठक तापण्याची चिन्हे आहेत.राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर जळगावला पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील मिळाले. राज्यातील नवे सरकार, जिल्ह्याचे पालकमंत्रीही नवे अशा स्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक २० जानेवारी रोजी होणार आहे.त्यात जिल्ह्यात विविध विभागांना २०१९-२०२० या वर्षासाठी वितरीत करण्यात आलेल्या १६१ कोटी ५८ लाख ९२ हजाराच्या निधीपैकी ४३ कोटी ९७ लाख ४ हजार रुपये अखर्चिक आहे. या सोबतच २०१७पासूनचा आमदार निधीदेखील विविध विभागांकडून खर्च झालेला नाही. जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच विभागांकडे निधी शिल्लक आहे. या शिल्लक विकास निधीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाऊन बैठक गाजण्याची शक्यता आहे.तरसोद ते फागणे महामार्ग, जळगाव ते औरंगाबाद महामार्गावरील रखडलेले चौपदरीकरण यामुळे होणारे अपघात, शिधा पत्रीकाद्वारे न मिळणारे धान्य, शहरातील धिम्या गतीने सुरू असलेले चौपदरीकरण, जळगाव विमान सेवेच्या अडचणीसह विविध विषयांवर ही सभा गाजण्याची चिन्हे आहेत.२० रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हा नियोजन भवनात होणार आहे. २०२०-२०२१ या वर्षाचा आर्थिक आराखडा यावेळी ठरविला जाणार असून यंदा ४३६ कोटी ७७ लाख ५१ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१९-२०२० च्या आर्थिक वर्षातील आढावादेखील या वेळी घेतला जाईल.दरम्यान, आमदार निधीचा खर्च न झाल्याने या संदर्भात संबंधित यंत्रणांना मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पत्रही देण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव