शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची लोकप्रियता व विश्वासार्हता अढळ - एकनाथराव खडसे यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 11:55 IST

४१ व्या वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव : ‘लोकमत’ने खान्देशच्या मातीशी इमान कायम ठेवल्याने ‘लोकमत’ची लोकप्रियता व विश्वासार्हता अढळ असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री एकनाथराव खडसे काढले.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचा ४१ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, १५ डिसेंबर रोजी औद्योगिक वसाहतमधील ‘लोकमत’ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी स्वत: उपस्थित राहून तर काहींनी भ्रमणध्वनी, दूरध्वनी व सोशल मीडियाद्वारेही शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, ‘शाकाहार सदाचार’चे प्रणेते रतनलाल सी.बाफना, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर रमेशदादा जैन, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.गुुलाबी थंडीत सायंकाळी सहा वाजता ‘लोकमत’च्या हिरवळीवर या स्नेहमेळाव्यास सुरुवात झाली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्जवालन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘वसा व वारसा’ या विशेषांकाचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त एन.डी. तडवी, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार अ‍ॅड.जयप्रकाश बाविस्कर, इंदिराताई पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.सुशील अत्रे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, विरोधीपक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, माजी उपमहापौर भारती सोनवणे, डॉ.सुभाष चौधरी, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.चारुदत्त गोखले, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, डॉ.विश्वेश अग्रवाल, डॉ.प्रिती अग्रवाल, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, कृषी बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, डॉ. दत्तात्रय बिराजदार, जळगाव पीपल्स बँकेचे संचालक अनिकेत पाटील, आयएमएचे सचिव डॉ. विलास भोळे, सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. भरत बोरोले, जि. प. समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जि. प. महिला बाल कल्याण आणि बांधकाम सभापती रजनी जगन्नाथ चव्हाण, जि.प.सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे, जि. प.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोशणाईचा लखलखाट व गुलाबी थंडीत रंगला स्नेहसोहळाखान्देशी मातीची, माणसाची शान आणि मान उंचावणाऱ्या ‘लोकमत’ने शुक्रवारी संध्याकाळी शेकडो वाचक आणि हितचिंतकांच्या साक्षीने ४२व्या वर्षात पदार्पण केले. रोशणाईचा लखलखाट व गुलाबी थंडी अशा आल्हाददायक वातावरणात शुभेच्छांचा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. या सोहळ्याला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री संजय सावकारे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, केसीईचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे उपस्थित होते़

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव