जळगावात आत्महत्या केलेल्या पोलिसाच्या पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 08:04 PM2018-08-28T20:04:21+5:302018-08-28T20:06:19+5:30

पोलीस कर्मचारी रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३, रा.शिव कॉलनी, जळगाव) याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी क्रांती उर्फ पूनम पाटील हिला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आधी अटक केलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी व क्रांती या दोघांना तपासाधिकारी बी.जी.रोहोम यांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.सोनी यांनी क्रांती हिला ३० आॅगस्ट तर सागर याला १ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Police's wife arrested in Jalgaon | जळगावात आत्महत्या केलेल्या पोलिसाच्या पत्नीला अटक

जळगावात आत्महत्या केलेल्या पोलिसाच्या पत्नीला अटक

Next
ठळक मुद्देपोलीस व मयताच्या पत्नीला पोलीस कोठडीपत्नी क्रांती व पोलीस कर्मचारी रुपेश यांचे मोबाईल सीडीआर तपासणार

जळगाव : पोलीस कर्मचारी रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३, रा.शिव कॉलनी, जळगाव) याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी क्रांती उर्फ पूनम पाटील हिला रामानंद नगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आधी अटक केलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी व क्रांती या दोघांना तपासाधिकारी बी.जी.रोहोम यांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.सोनी यांनी क्रांती हिला ३० आॅगस्ट तर सागर याला १ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पत्नीचे सागर तडवी या पोलीस कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंधाच्या संशयावरुन रुपेश पाटील या पोलीस कर्मचाºयाने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री शिव कॉलनीत घडली होती.
याप्रकरणी याप्रकरणी सागर रमजान तडवी, पत्नी क्रांती उर्फ पूनम, सासू वर्षा यशवंत पाटील, सासरे यशवंत पाटील, शालक कल्पेश व जितू या सहा जणांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व सागर तडवी याला अटक करण्यात आली होती. मंगळवारी क्रांती हिला अटक करण्यात आली.

Web Title: Police's wife arrested in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.