शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा वावर भाजपा पदाधिकाऱ्यांसारखा : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:20 IST

सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.

ठळक मुद्देखोटे गुन्हे दाखल करून अडविण्याचा प्रयत्नजळगाव जिल्ह्यात झाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावाभाजपा सरकार शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप

जळगाव : सरकार आमचे पण होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधी पैशांची मस्ती येऊ दिली नाही व शासकीय अधिका-यांचा गैरवापर देखील केला नाही. सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मेळाव्यात आपल्या भाषणा दरम्यान प्रशासनाला दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा ‘ वन बुथ १५ युथ’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता मेळावा झाला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदरआपल्या भाषणात संग्राम कोते-पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीत पराभवामुळे पक्ष संघटनेचे मोठे काम आमच्या समोर होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन वाढविले. त्यामुळे पक्षाने कदर केली. माझा तालुकाध्यक्ष होण्यासाठी संघर्ष सुरु असताना पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे सांगत राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्याची कदर होत असल्याचे सांगितले.विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नसध्याचे सरकार हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशाच खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांचे नेहमी धमकीचे फोनसंघटना चालवित असताना पोलिसांकडून नेहमी धमकीचे फोन येत असतात. मात्र आपण घाबरणाºयांमधले नाहीत. भाजपा सरकार कडे सत्ता आहे म्हणून रडीचा डाव खेळला जात आहे. भाजपाकडे सत्तेची मस्ती आहे. त्यातूनच शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत असंवेदशनीलता निर्माण होते.मुख्यमंत्र्यांचे खोटे बोल पण रेटून बोलमुख्यमंत्री व पंतप्रधान हे सतत परदेश दौºयावर राहतात. मात्र त्यातून किती उद्योग आणले, किती लोकांना रोजगार मिळाला याची माहिती जनतेला द्यावी. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात रोज खून, दरोडे व गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस