शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

पोलिसांचा खबऱ्या ते अट्टल चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:06 IST

बेवारसचा शिक्का लागल्याने निवडला चोरीचा मार्ग : आईचे निधन, वडीलांनी सोडली साथ

जळगाव : माता काय असते..हे समजण्याच्या आतच तिने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर पित्याने दुसरे लग्न करुन पालकत्वाची जबाबदारी सोडली. त्यामुळे आजीने पालन पोषण केले. आठवीत शिक्षण घेत असताना आजीचेही निधन झाले. यानंतर पालन पोषण करणारे कोणीच नव्हते. त्यामुळे बेवारसचा शिक्का लागला. जगण्यासाठी विकास उर्फ विक्की चंद्रकांत साळुंखे (२५, रा. कंडारी, ता. भुसावळ) हा तरुण पोलिसांचा खबºया बनला नंतर थेट गुन्हेगारीचा शॉर्टकट वापरुन काही दिवसातच सराईत चोरटा बनला.विक्की याला शनी पेठ पोलिसांनी गेल्या आठवड्यात डी.जे.च्या वाहनातील एम्ल्पीफायर चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. भुसावळातील मित्राच्या माध्यमातून त्याने एम्ल्पीफायर विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला. चौकशीत त्याने तीन दुचाकी चोरी केल्याचेही निष्पन्न झाले. या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विक्कीकडून चोरीच्या दुचाकी घेणाºया इसरा वली अहद शेख (२५, रा. चिनावल ता.रावेर) याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.सदाशिव नगरातील मयुर रमेश सावदेकर यांच्या मालकीच्या डी.जेच्या वाहनातील तीन एम्लिफायर लांबविल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली होती. पोलिसांनी संशयित विकास ऊर्फ विक्की यास मुद्देमालासह अटक केली आहे. तो आता न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. आता दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात विक्की यास शनिपेठ पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले.मामाच्या मुलामुळे पहिल्यांदाचा चोरली सुरतहून दुचाकीरावेर तालुक्यातील चिनावल येथे विक्की याचा मामेभाऊ बंटी कोळी वास्तव्यास आहे. आजीच्या निधनानंतर विक्की काही दिवस बंटीसोबत सुरत येथे वास्तव्यास होता. विक्कीने पहिल्यांदा बंटीसोबत सुरत येथून दुचाकी चोरली. ही दुचाकी बंटीच्या ओळखीतून चिनावल येथे इसररा वलीअहद शेख याला विक्री केली होती. याच माध्यमातून विक्कीची चोरीची दुचाकी घेणारा इसररा याच्याशी परिचय झाला होता.पोलिसांच्या मर्यादा ओळखल्याविक्की हा भुसावळ येथे रहात असताना तेथील पोलिसांच्या संपर्कात आला. पोलिसांनी सांगितलेली कामे करु लागला. पुढे जावून तो पोलिसांचा खबºया झाला. त्याच्या माध्यमातून भुसावळात पोलिसांनी अनेक चोरी, घरफोडी व इतर गुन्हे उघडकीस आणले. पुढे जावून तो थेट गुन्हेगारीत उतरला. सतत पोलिसांच्या संपर्कात असल्याने त्याला पोलिसांच्या मर्यादांची जाणीव आहे, त्याचाच फायदा उचलून तो गुन्हेगारी करीत असल्याचे शनी पेठ पोलिसांनी सांगितले.जळगावातून दोन, अमळनेरातून एक दुचाकी चोरली1 विक्की पाच वर्षाचा असताना आईचे निधन झाले होते. भुसावळात लहानाचा मोठा झाला. त्यानंतर भुसावळ सोडल्यानंतर आजीचे घर विक्कीने भाड्याने देवून तो जळगावातील धनाजी परिसरात आला. याठिकाणी तो वृध्द दाम्पत्याच्या घरी सहा हजार रुपये महिने भाडे करारावर वास्तव्यास होता. याच परिसरातील नागरिकांशी त्याने ओळखी केली. ओळखीतून मामा, मामी असे नातेही बनविले. सात महिन्यापासून तो याचठिकाणी राहतो. यादरम्यान विक्कीने राहत असलेल्या परिसरातून प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरल्या. यानंतर अमळनेर येथून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी केली. या दुचाकी त्याने मावसभावामुळे संपर्कात आलेल्या इसररा वलीअहद शेख याला विकल्याची माहिती दिली.पोलिसांनी लावला छडा2 पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील, परिस जाधव, संदीप पाटील, अमित बाविस्कर, अभिजित सैंदाणे, गणेश गव्हाळे, नितीन बाविस्कर, अमोल विसपुते, मुकूंद गंगावणे, राहुल घेटे, अनिल कांबळे, राहुल पाटील, किरण वानखेडे, अखलाख शेख, मनोज येवुलकर यांच्या पथकाने चिनावलहून इसररा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडूनही चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील एक दुचाकी कोणत्या ठिकाणाहून चोरली हे निष्पन्न झाले नसून तपासात ते समोर येणार आहे.सुरतला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद3 सुरत येथे दुचाकी चोरीचा प्रकारसीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला होता. याप्रकरणात बंटी कोळी व विक्की साळुंखे यांना गुजरात पोलिसांनी तसेच तेथील नागरिकांनी चांगलेच बदडले होते. यादरम्यान बंटीने दुचाकी परत करतो, गुन्हा दाखल करु नका अशी विनवणी केली होती. दहा हजारात रुपयात बंटीने ही दुचाकी इसररा यास विक्री केली होती. मात्र गुन्हा दाखल होवू नये म्हणून बंटीने इसररा यास १४ हजार रुपये देवून पुन्हा दुचाकी परत घेतली व दुचाकी सुरत जावून परत केली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान विक्कीने सुरत येथून अनेक दुचाकी चोरल्याचा संशय असून त्याचा तपास सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव