शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन जळगावात पोलिसाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:05 IST

पत्नीचे सहकारी पोलिसाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेल्या रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३) या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री जळगावातील शिव कॉलनीत घडली.

ठळक मुद्देशिव कॉलनीत घेतला गळफासआत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठीसंशयित आरोपी असलेल्या पोलिसाला अटकरविवारी रात्री १२ वाजता संपविली जीवनयात्रा

जळगाव : पत्नीचे सहकारी पोलिसाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेल्या रुपेश विश्वनाथ पाटील (वय ३३) या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री जळगावातील शिव कॉलनीत घडली.दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला याच पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सागर रमजान तडवी तसेच सासू, सासरे व दोन शालक यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर तडवी याला अटक करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिव कॉलनीत रविवारी मध्यरात्री १२ वाजता रुपेश पाटील या पोलिसानेआत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनचे किरण पाटील व राहूल खोडे यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर दोन वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. रात्री प्रथम या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर सोमवारी दुपारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी दुपारी साडे बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगावPoliceपोलिस