शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षकाने लगावली हातगाडीचालकाच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 20:56 IST

पोलीस उपनिरीक्षकाने हातगाडीचालकाच्या कानशिलात लगावली

ठळक मुद्देकानाला दुखापतजिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणार तक्रार

बोदवड : पोलीस उपनिरीक्षकाने हातगाडीचालकाच्या कानशिलात लगावल्याची घटना बोदवड येथे बुधवारी दुपारी घडली.  सूत्रांनुसार, शहरातील टांगा स्टँड परिसरात हातगाडी लावणाऱ्या लोटगाडीधारकांना पोलीस वाहनावर चालक असलेल्या महेंद्र लहासे तसेच वसीम तडवी यांनी सर्व पोलीस ठाण्यात या, असे सांगून गेले होते. त्यात सय्यद लुकमान बागवान, शेख इसाक बागवान, रवींद्र धनगर, किरण कपले  हे पोलीस ठाण्यात गेले. परंतु उशिरापर्यंत गुप्ता व्यापारी संकुलाजवळ असलेला हातगाडीधारक सय्यद युसुफ सय्यद करीम हा गेला नाही. त्याचा राग आल्याने पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालाचे यांनी त्याच्याजवळ जात ‘काय रे, तुला सांगितलेले कळत नाही का?’ असे सांगून त्याच्या कानशिलात लगावली. त्यात त्याच्या डाव्या कानाला सूज येऊन दुखापत झाली. हा प्रकार  त्यांनी शहरातील नगराध्यक्षांचे पती सईद बागवान यांच्याकडे धाव घेतली व झालेला प्रकार सांगितला.सईद बागवान, नगरसेवक सुनील बोरसे तसेच सलीम कुरेशी यांच्यासह शहरातील काही हातगाडीधारक पोलीस ठाण्यात  दाखल झाले. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे या तरुणाला दाखवले असता त्यांनी समजूत घालत तरुणाला दवाखान्याला पाठवले.पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सय्यद युसुफ सय्यद करीम याची समजून घातली.आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे या प्रकरणाची माहिती दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.याबाबत अद्याप गुन्हा दाखल नाही.दरम्यान, सय्यद युसुफ सय्यद करीम  याचे पालक गुरुवारी जळगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती देणार आहेत.

नगरसेवक व नगराध्यक्षांचे पती आपल्याकडे हातगाडीचालकांना घेऊन आले होते. संबंधित तरुणाला लागलेले नाही. परंतु तरीही त्याला दवाखान्याला  जाऊन ये, असे सांगितले. उपनिरीक्षकास साप्ताहिक असल्याने त्यांच्याशी दुपारी बोलून घेतले. -राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, बोदवड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड