शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:29 IST

एकाच जागेवर तीन अपघात

ठळक मुद्देखड्डयामुळे दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू

जळगाव : खड्डयात दुचाकी घसरुन डोक्याला मार लागल्याने बिपीनसिंग राजरमन सिंग (३२, रा. पंढरपुरनगर, एमआयडीसी जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खड्डे खोदणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शेकडो कामगारांनी गुरुवारी सकाळी मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसीतील इंद्रायणी पॉलीमर या चटई कंपनीत ठेकेदार असलेला बिपीन सिंग राजरमन सिंग हा तरुण बुधवारी रात्री साडे दहा वाजता कुसुंबा येथून दुचाकीने (क्र.एम.एच. १९ डब्लु. ६०६८) घरी जात असताना एमआयडीसीतील तुलसी पाईपनजीक एफ सेक्टरमधील महालक्ष्मी दालमिल व चिन्मय एन्टरप्रायजेस या कंपनीसमोर रस्त्यावर गतिरोधकासारखा उंच खड्डयावर दुचाकी घसरुन कोसळला. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने प्रंचड रक्तस्त्राव झाला. त्यावेळी परिसरातील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. बिपीन सिंग याच्या मोबाईलवर पत्नीशी संपर्क साधला. त्यामुळे पत्नी अलका हिने बिपीस सिंगचे मित्र रमेश प्रेमपाल मिधा व अनिल बुधसिंग कुशवाह यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठून जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉ.स्वप्नील कळसकर यांनी बिपीनसिंग याला मृत घोषित केले.शवविच्छेदनानंतर आणला मृतदेह पोलीस ठाण्यातरस्त्यात खोदलेल्या खड्डयामुळे बिपीससिंग याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष ललनसिंग यादव, के.सी.पांडे व अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जण एकत्र आले. शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी १० वाजता मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तेथे रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून पोलिसांकडे मागणी केली. तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात याच कारणावरुन वाद सुरु होता. ललनसिंग व सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांची भेट घेतली. कंत्राटदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह तेथून हलविण्यात आला. दरम्यान, बिपीनसिंग याच्यावरमध्य प्रदेशातील रिवा या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, मृत झालेला बिपीस सिंग हा उत्तर भारतीय संघाचा कार्यवाहक होता.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हे.कॉ.भरत लिंगायत तपास करीत आहेत.घटनेनंतर खड्डयाची दुरुस्ती करणाºयांना पिटाळलेया घटनेनंतर औद्योगिक विकास महामंडळाचे कंत्राटदार एस.जी.भंगाळे यांनी सकाळी सात ते आठ मजुर पाठवून पाईपासाठी खोदून उंच झालेल्या खड्ड्याची दुरुस्तीसाठी पाठविले. हा प्रकार समजताच चटई कामगार व उत्तर भारतीय संघाच्या लोकांनी घटनास्थळी भेट घेऊन दुरुस्ती करणाºयांना पिटाळून लावले. यावेळी काही जणांना मारहाण झाल्याचेही सांगितले जात होते, मात्र ललनसिंग यांनी त्याचा इन्कार केला आहे. घटनास्थळावरुन काही मजुर पळून गेल्याने दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.पत्नी सात महिन्याची गरोदरबिपीस सिंग मुळचा उत्तर प्रदेशातील असून दहा वर्षापासून जळगावात स्थायिक होता. पत्नी अलका सात महिन्याची गरोदर आहे. त्यामुळे प्रसुतीसाठी २ मार्च रोजी तो पत्नीला मुळ गावी सोडायला जाणार होता. तत्पूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. सायंकाळी मृतदेह मुळ गावाकडे रवाना झाला.भंगाळे यांना दिला कंत्राट...याबाबत औद्यागिक विकास महामंडळाचे उपअभियंता पी.पी.पाटील यांना विचारले असता, वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत एमआयडीसीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट एस.जी.भंगाळे यांना देण्यात आले आहे. या भागात प्रचंड पाणी साचत असल्याने या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून रस्त्यात खड्डा खोदून त्यात पाईप टाकण्यात आला आहे. काम झाल्यानंतर खड्डा बुजविण्यात आल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर खड्डा दुरुस्तीच्या कामाला होणारा विरोध व संभाव्य घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी पाटील यांनी पोलीस निरीक्षक शिरसाठ यांची भेट घेतली. कंत्राटदार भंगाळे हेदखील पोलिसात आले होते. उशिरापर्यंत गुन्हाच दाखल झाला नाही.