शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

चार दुकानांवर पोलिसांचे धाड सत्र ; १ लाख १८ हजाराचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:06 IST

गुन्हा दाखल : पोलीस उपअधीक्षकांसह एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : प्रतिबंधित असलेला गुटखा साठवून ठेवून विक्री करणा-या चार दुकांनावर मंगळवारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १८ हजार ८९६ रूपयांचा आरएमडी, गुटखा, पानमसाला जप्त केला आहे. तसेच संबंधित दुकान चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेरा चौकातील समर्थ कृपा प्रोव्हीजन येथून ३४ हजार ५३८ रूपयांचा प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, सिगारेट, आरएमडी जप्त करण्यात आले. दुसर्या कारवाईत पटेल प्रोव्हीजन येथे छापा टाकला़ या दुकानातून १६ हजार २६८ रूपयांचा प्रतिबंधित जर्दा, गुटखा, तंबाखु, पानमसाला जप्त करण्यात आला.तिसर्या कारवाईत याच भागातील गणेश ट्रेडर्स येथे छापा मारला. याठिकाणी बाबुलाल पांडुरंग खांदे (४९, रा.अयोध्या नगर) याच्याकडून ५४ हजार ४९० रूपयांचा पानमसाला, तंबाखु जप्त करून सील केला.सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ईच्छादेवी चौकातील खुशी ट्रेडर्स येथे छापा टाकला़ रमेश चेतवाणी हा घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्या दुकानातून १५ हजार ६०० रूपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला आहे.या प्रकरणी दीपक गगराळे, शेख फरीद शेख नशीर, बाबुलाल पांडुरंग खांदे, छोटु नसीर पटेल, रमेश जेठानंद चेतवाणी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव