शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध ऑनलाइन लॉटरी दुकानांवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:05 IST

२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त : चार दुकानांवर कारवाई

जळगाव : जुने बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैैध चार ऑनलाइन लॉटरी दुकानांवर गुरुवारी दुपारी शहर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी १४ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जुने बसस्थानक परिसरातील एका गाळ्यामध्ये गजानन लॉटरी, जय वाल्मीक लॉटरी, साईनाथ लॉटरी यासह आणखी एका लॉटरीच्या दुकानावर ऑनलाइन येणाऱ्या आकड्यावर ग्राहकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच शहर पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने दुपारी ३ वाजता जुने बसस्थानक परिसरातील एका लॉटरीच्या दुकानात छापा मारला. त्याठिकाणी संतोष नामदेव खजुरे (रा.गोपाळपुरा) हा सट्टा खेळविताना आढळून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळून २८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अर्धा-अर्धा तासात पोलिसांचे छापेदुपारी तीन वाजता पहिला छापा मारल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता लागलीच गजानन लॉटरी दुकानात छापा मारला. याठिकाणी रितेश सुभाष पांडे, गणेश श्रावण लेकुरवाळे, रमेश प्रभाकर जोशी, आकाश लक्ष्मण सोनवणे हे सट्टा खेळविताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सुमारे ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लागलीच ४ वाजता जय वाल्मीक लॉटरी येथील पोलिसांनी धाड टाकून लक्ष्मण सोनवणे, अनिल फालक, प्रदीप कोलते यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ५९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. साडेचार वाजता पुन्हा साईनाथ लॉटरी दुकानात पोलिसांनी छापा टाकल्यावर त्यांना अजय कोळी, राजू कोळी, सचिन जाधव, आकाश कोळी, अशोक मोरे, विनोद राठोड असे सट्टा जुगार खेळ खेळताना व खेळविताना आढळून आले. त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ८९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.यांनी केली कारवाईसहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्यासह विजय निकुंभ, उमेश भांडारकर, सचिन वाघ, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, रतन गिते आदींनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव