आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१५ : भुसावळ येथून शाळेचे विद्यार्थी घेऊन येणाºया स्कूलचे शस्त्रधारी चार अतिरेक्यांकडून साकेगाव पुलाजवळ अपहरण होते. त्यानंतर पोलिसांनी राबविलेल्या आॅपरेशनमध्ये जळगाव शहरात महामार्गावर कालिंका माता चौकात अपघात झाल्याचे भासवून स्कूल बस थांबविण्यात येते. तेथे वाद सोडविण्यासाठी दोन अतिरेकी बसच्या खाली उतरताच अतिरेक्यांना घेरुन बस ताब्यात घेण्यात येवून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात येते. या अपहरण नाट्यात तीन अतिरेक्यांचा खात्मा होता तर एकाला जीवंत पकडण्यात येते. या घटनेचे थरारक प्रात्यक्षिक गुरुवारी पोलीस दलाने केले.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.के.चौबे पोलीस दलाच्या तपासणीसाठी जिल्हा दौºयावर आले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या उपस्थित पोलीस कवायत मैदानावर परेड झाली. त्यानंतर पोलीस दलाने तयार केलेल्या अपहरणाच्या घटनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हे प्रात्यक्षिक जणू सत्य घटनाच असल्याचा भास उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांना झाला. बोलके प्रात्यक्षिक पाहून अनेक जण थक्क झाले.
जळगावात पोलिसांकडून थरारक प्रात्याक्षिक सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:57 IST
नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून तपासणी
जळगावात पोलिसांकडून थरारक प्रात्याक्षिक सादर
ठळक मुद्देअतिरेक्यांकडून शालेय मुलांच्या अपहरणाचे जळगाव पोलिसांकडून प्रात्याक्षिककालंका माता मंदिराजवळ पोलिसांनी केली विद्यार्थ्यांची सुटकाविशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस दलाच्या तपासणीसाठी जिल्हा दौ-यावर