शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:26 IST

अजिंठा चौकातील घटना

ठळक मुद्देरस्त्यावर हटकल्याचा आला रागचौघांना तत्काळ अटक

जळगाव : वाहतुकीला अडथळा निर्माण करु नका असे बोलल्याचा राग आल्याने अरशद कासम गवळी (वय २९) या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला अश्लिल शिवीगाळ करीत कॉलर पकडून चौघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता अजिंठा चौकात घडली.याप्रकरणी गणेश प्रकाश चौधरी, महेंद्र अशोक महाजन (रा.कालिंका माता चौक, जळगाव), हेमंत संजय खैरनार (रा.विठ्ठल पेठ, जळगाव)व निलेश उखा पवार (रा.अयोध्या नगर, जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व सहकाऱ्यांनी या चौघांना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव करीत आहेत.वाहतुकीचा खोंबळा होत असल्याने हटकलेयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गणेशाची स्थापनानिमित्त मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता गुरुवारी अजिंठा चौकात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर वाहतूक शाखेचे राहूल कुमावत, अरशद गवळी, गजानन राठोड व मदन पावरा हे ड्युटीवर असताना गवळी यांनी भुसावळ येथे जाणाºया रिक्षा थांब्यावर गर्दी करत असलेल्या चार तरुणांना वाहतूकीला खोळंबा होत असल्याने इथे थांबू नका असे सांगितले असता त्याचा राग आल्याने गणेश चौधरी याने तु कोण आम्हाला सांगणारा असे म्हणत अश्लिल शिविगाळ करीत गवळी यांची कॉलर पकडली व तोंडावर बुक्का मारला. तर महेंद्र महाजन, हेमंत खैरनार व निलेश पवार यांनीही गवळी यांना पकडून मारहाण केली.हा प्रकार पाहिल्यानंतर गवळी यांना अन्य सहकाºयांनी मारहाणकर्त्यांच्या तावडीतून सोडविले या चौघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे चौकात प्रचंड गर्दी झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव