शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निंबोल दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:09 IST

रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपीची माहिती देणाºयास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे.

ठळक मुद्देनिंबोल येथील विजया बँक दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या हत्येचा मारेकरी अद्याप मोकाटचतिनो मुलको की पुलीस ‘डॉन’ का पिछा कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकीन लगता हैदरोडा-खुनाच्या घटनेस होणार आता एक महिना

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपींची  माहिती देणाºयास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे.निंबोल येथील विजया बँकेत दोन हेल्मेटधारी मोटारसायकलस्वार दरोडेखोरांनी दरोड्याच्या प्रयत्नात सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करून पोबारा केला होता. साधारणपणे एक महिन्यापूर्वी १८ जून रोजी दुपारी २:२० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.दिवसाढवळ्या ग्रामीण भागातील बँकेत दरोडेखोरांनी शिरकाव करून थेट गोळीबार करण्याची खळबळजनक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रोहम यांनी घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याच्या प्रयत्नात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सर्व कंगोरे तपासण्यासाठी तब्बल ७२ तास ठिय्या मारून नियोजनबद्ध बैठका घेऊन तपासचक्र फिरवले.एव्हाना, नाशिक विभाग, अमरावती विभागातील स्थानिक गुन्हे शाखेच्या निष्णात पोलीस पथकांची नियुक्ती करून तथा मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश पोलिसांशी समन्वय साधून व तपासासाठी तब्बल महिनाभरापासून थेट विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांच्याकडून तपासाचे चक्र फिरवत मागोवा घेतला जात असला तरी, सदर प्रकरणी अद्यापही तपासाचा धागा गवसलेला नाही.या घटनेतील हेल्मेटधारी मोटारसायकलस्वार एक दरोडेखोर विजया बँक शाखेत एक दिवस आधी हेरगिरी करून गेल्याचे आढळून आले आहे. संबंधित आरोपींनी घटनेच्या पूर्वीपासून तर थेट पसार होईपर्यंत मोबाइलचा वापर न करण्याची खबरदारी घेतल्याने सदरील आरोपी सर्राईत तथा व्यावसायिक असल्याचा पोलिसांचा एक मतप्रवाह दिसून येतो, तर आरोपींनी बँकेतून रक्कम लंपास न करताच पलायन करताना झाडलेल्या गोळीत सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची हत्या झाल्याने सदरील आरोपी हे सराईत नसल्याचा पोलिसांचा दुसरा मतप्रवाह आहे.मोबाइलच्या ध्वनीलहरींच्या कार्यक्षेत्रात आरोपींचा कोणताही संपर्क आढळून येत नाही, तर मयताच्या मोबाइल कॉल रेकॉर्डमध्ये कोणताही धागा गवसत नसल्याने पोलीस तपासात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉन या हिंदी चित्रपटातील ‘ग्यारह मुलको की पुलीस डॉन का पिछा कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है’ या संवादफेकीला जनसामान्यांमधून उजाळा दिला जात आहे.अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंंजाबराव उगले यांनी निंबोल बँक दरोड्याच्या प्रयत्नात खून करणाºया आरोपीचे नाव निंभोरा पोलिसात वा स्थानिक गुन्हे शाखेला कळवणाºयास एक लाख रुपये इनाम घोषित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर