शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात बदल्यांचे वारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:17 IST

सुनील पाटीलजिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी पसंतीच्या ...

सुनील पाटीलजिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी पसंतीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आपआपल्या पध्दतीने फिल्डींग लावली आहे. पोलीस दलात अधिकाºयांच्या बदलीचा इतका त्रास होत नाही, त्याहीपेक्षा कर्मचारी बदलीत पोलीस अधीक्षकांना होतो. आमदारापासून तर मंत्र्यांपर्यंतच्या शिफारशी या बदल्यात होतात. शिफारशीनेही काम झाले नाही तर थेट मंत्र्यांनाच फोन करायला भाग पाडले जाते. प्रत्येक बदलीत कोणाचा अन् कोणाचा तरी कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला असतो.पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत राजकीय दबाव झुगारुन लावला होता. राजकीय दबाव आणणाºया कर्मचाºयाची इच्छीतस्थळी बदली न करता दुसºयाच ठिकाणी बदली केल्याचे काही किस्से घडले होते. यातून कराळे यांनी शिस्तीची जाणीव करुन दिली होती. कराळे यांची पदोन्नती झालेली आहे, त्यामुळे केव्हाही त्यांच्या बदलीचे आदेश येऊ शकतात. नवीन अधीक्षक कोण व कसा असणार याची चिंता बदलीपात्र कर्मचाºयांना लागली आहे. त्यामुळे कराळे यांच्या काळात बदलीचे गॅझेट निघाले तर काही अंशी मनासारखी बदली मिळेल अशी अपेक्षा काही कर्मचाºयांना आहे.कर्मचाºयांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व सहा पोलीस निरीक्षक बदलीस पात्र आहेत. या सर्वांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. पोलीस अधीक्षक कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व निलोत्पल हे पदोन्नतीने बदलून जाणार आहेत. पोलीस स्टेशनचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या प्रभारी अधिकाºयांच्याही महिनाभरात बदल्या होणार आहेत. सहायक निरीक्षक प्रभारी असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय जळगाव उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांचाही काही महिन्यात कार्यकाळ पूर्ण होणार आहे.आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता त्यांच्या काळात ही निवडणूक होती की त्यापूर्वीच त्यांची बदली होते याकडेही शहरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. एप्रिल ते जून असे तीन महिने कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीचा काळ असतो. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालक अशा तीन टप्प्यात बदल्या होतात.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव