शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोंढाळा येथील एका विहिरीत अज्ञातांनी टाकले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:35 IST

उत्तम काळेभुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ...

ठळक मुद्देशेतकºयाने शेतमालावर पाणी सोडून गुरांसाठी उपलब्ध केली होती विहीरभीषण पाणीटंचाईच्या संकटात प्रकार घडल्याने संतापसमाजकंटकांवर कारवाईची मागणी

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.यावर्षी भुसावळ तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. मोंढाळे येथे तर तालुक्यातून सर्वात जास्त भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त छापले आहे.अशा परिस्थितीत मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांनी शेतीच्या उत्पन्नावर पाणी सोडून त्यांचे मोंढाळा व शिंदी या रस्त्यावरील शेतातील विहीर गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. याच विहिरीजवळ दीपक परदेशी यांनी गेल्या १० ते १२ वर्षांपासून गुरांना पाणी पिण्यासाठी स्वखर्चाने हौद बांधून दिला आहे.या हौदाचा वापर मोंढाळेसह शिंदी येथील गुरांना उपयोग होत आहे. दररोज सुमारे ३०० ते ४०० गुरे या हौदावर पाणी पीत असल्याची माहिती दीपक परदेशी यांनी दिली. या रस्त्यावरून येणारे व जाणारे प्रवासी तसेच परिसरातील शेतकरी यांना उपयोग होत आहे.अशा परिस्थितीत काही अज्ञात समाजकंटक व्यक्तीने रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास विहिरीत विष टाकण्याचा प्रयोग केल्यामुळे शिंदी, मोंढाळा व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.परदेशी हे सायंकाळी सहा वाजेनंतर शेतात गेले. शेतातील विहिरीतील पाणी हे पांढऱ्या रंगाचे दिसायला लागले व तेथे वासही येऊ लागला. त्यामुळे त्यांना विहिरीत कीटकनाशक टाकल्याचा संशय आला.दरम्यान, परदेशी यांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क केला. मात्र पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या बंदोबस्तासाठी अडकले आहे. त्यामुळे उद्या मंगळवार, ९ रोजी पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ