भातखंडे बुद्रुक, ता. भडगाव : पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत व आरोग्य उपकेंद्र भातखंडे यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरण वृक्षरोपण नुकतेच करण्यात आले.
यावेळी आमडदे गिरड गटाच्या जिल्हा परिषद सदस्य स्नेहा गायकवाड, कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे, पिपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रतीक भोसले, भातखंड्याचे ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी, गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, पिंपरखेड रुग्ण कल्याण समितीचे सदस्य दादाभाऊ बनकर, सरपंच भागाबाई प्रकाश भिल, उपसरपंच उषाबाई भालेराव, माजी सरपंच अरुण विश्वनाथ पाटील, आरोग्य पर्यवेक्षक बी. एन. पांडे, आरोग्य सेवक पी. आर. पाटील, आरोग्य सेविका मनीषा परदेशी, मीनाक्षी बागुल, सोनल सोनार, मदतनीस सुनंदाबाई कदम, अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, विमलबाई महाजन, पल्लवी पाटील, सुरेखा पाटील उपस्थित होत्या.
ग्रामपंचायतीचे लिपिक संदीप पाटील, तुषार पाटील, योगेश पाटील यांनी सहकार्य केले.