शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

के.टी.वेअरचे पाणी वाया जाऊ नये यासाठी लावले प्लॅस्टिक आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:58 IST

.टी. वेअरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला

ठळक मुद्देभोरटेक येथे महिलांसह ग्रामस्थांनी केले जलपूजनकजगाव येथे तितूर नदीत आले चार वर्षात पहिल्यांदा पाणीकजगावच्या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव : सर्व दूर पावसाचा हाहाकार माजला, नद्या-नाले ओसंडून वाहिले. मात्र कजगावची तितूर नदी कोरडीच होती. २० रोजी कोरड्या तितूर नदीला अनेक अडथळे पार करीत चक्क चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाण्याच्या धारीचे नदीत आगमन झाले. या पाण्याच्या स्वागताला सारेच आतूर झालेले होते म्हणूनच भोरटेक येथे महिला व ग्रामस्थांनी जलपूजन केले, तर कजगावच्या के.टी. वेअरमध्ये पाणी अडविण्यासाठी सारा गावच सरसावला. या दोन्ही गावात नदीवर तोबा गर्दी झाली होती.पाटणादेवीजवळ उगम असलेल्या तितूर नदीस कजगाव परिसरात गेल्या चार वर्षांपासून पाणीच आलेले नव्हते. यामुळे तितूर किनाऱ्यावरील बागायती संपुष्टात आली होती. पाणी प्रश्नदेखील बिकट झाला होता. चार वर्षांत नदीचे रूपांतर ओस जमिनीसारखे झाले होते.आणि लोकवर्गणीतून नदी नांगरलीकजगाव येथे तितूर नदीचे रूपांतर ओस जमिनीसारखे झाल्याने दिनेश पाटील व ग्रामस्थ एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करून संपूर्ण नदीचे खोलीकरण करत पूर्ण नदी नांगरली होती. मात्र चक्क पावसाळा संपण्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील या नदीला पाणी न आल्याने या नदीने हिरव्या रानात रूप परिवर्तन केले होते. सर्व दूर हिरवेगार गवत नजरेस पडत होते.अनेक अडथळेतितूर नदीवर अनेक ठिकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आल्याने या नदीचे पाणी पुढे सरकतच नाही. यामुळे कजगावसह सात खेडे हे तितूरच्या पाण्यापासून वंचित होते. दि.१९ रोजी झालेल्या पावसामुळे तसेच इतर सिमेंट बंधारे तुडुंब भरल्याने तितूरची धार कजगावपर्यंत पोहचली आहे. जेमतेम आलेल्या या पाण्याचा साठोबा कजगावच्या के.टी. वेअरमध्ये व्हावा, त्याला गळती लागू नये यासाठी ते पाणी कजगावात पोहचण्याच्या आधीच कजगावच्या युवकांनी या के.टी.वेअरच्या प्लेटांना प्लॅस्टिक कागदाचे आवरण चढवत पाणी गळतीपासून बचाव करण्यासाठी तयारी केली, तर तब्बल चार वर्षांनंतर आलेल्या पाण्याचे भोरटेक येथे महिलांनी जलपूजन केले. याप्रसंगी पूर्ण गाव नदीमध्ये जमले होते.

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव