भुसावळ : येथील शहर पत्रकार संस्था आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्यातर्फे नाना पाटील यांच्या आई वैजंताबाई शंकर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रांताधिकारी कार्यालय आवारात १५ रोपांचे ट्रीगार्डसह वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक ढिवरे, मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण तसेच पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, पत्रकार उज्ज्वला बागुल, राकेश कोल्हे, प्रदीप पाटील, राजेश तायडे, कलीम पायलट, कमलेश चौधरी, संतोष शेलोडे, सुनील आराक, गोपी म्यांद्रे, सतीश कांबळे, विनोद गोरधे, सद्दाम खाटीक, रमेश खंडारे, अखिलेश धिमान, मनीषा शिरतुरे, प्रतिभा लोहार आदींसह निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य समन्वयक नाना शंकर पाटील, रघुनाथ सोनवणे, सुरेंद्रसिंग पाटील, जी. आर. ठाकूर आदी उपस्थित होते.