शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानासाठी धोरण ठरविणार, मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला प्लॅन 

By विजय.सैतवाल | Updated: April 7, 2023 18:31 IST

जळगावात अवयवदान जनजागृती, उपचार अभियानास प्रारंभ 

जळगाव : अवयवदानामुळे कोणाला जीवदान मिळू शकत असले तरी त्या साठी नागरिक पुढे येत नाही. या विषयी जनजागृती वाढून त्यासाठी प्रोत्साहन मिळावे व अवयवदान वाढावे, यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल,  अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अवयवदान जनजागृती व उपचार अभियानास शुक्रवार, ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून प्रारंभ करण्यात आला.

पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जनजागृती अभियानाचे फलक हाती घेऊन मान्यवरांनी अभियानाला सुरुवात केली. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावस्कर, नोडल ऑफिसर डॉ. सुनयना कुमठेकर  उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतला सेल्फी

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभियानाविषयी माहिती दिली. यावेळी अवयवदान केलेल्या नातेवाईकांचा व जनजागृती करणारे डॉ. पल्लवी राणे, डॉ. रवींद्र पाटील, सीमा भगत, किशोर सूर्यवंशी यांचा पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.  अवयवदान जनजागृतीबाबत महाविद्यालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे उदघाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच रांगोळी, पोस्टर्सचे अवलोकन केले. याठिकाणी जनजागृतीपर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर त्यांनी सेल्फी घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री यांनी ट्रॉफी देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्या ग्रुपचादेखील सत्कार केला. यावेळी अवयवदान जनजागृतीची उपस्थितांना शपथ देण्यात आली.  

डीपीसीतून निधीअवयवदान श्रेष्ठदान असून नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रचार व प्रसारासाठी पुढे आले पाहिजे. अवयवदान मोहिमेसाठी शासकीय पातळीवर विविध विकासात्मक निर्णय घेतले जातील. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीसी) निधी उपलब्ध करून देत लोककलावंतांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती केली जाई‌ल, असेही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले तर  डॉ. योगिता बावस्कर यांनी आभार मानले. यावेळी विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रुग्णांची चौकशीकार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची  चौकशी केली. रुग्णालयातील सेवा-सुविधांविषयी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली.  

स्पर्धेतील विजेतेपोस्टर स्पर्धा - प्रथम : प्रतिज्ञा मोरे व कृष्णाई साळुंखे, द्वितीय : हनीफा मोमीन, तृतीय : प्रियंका शेळके. रांगोळी स्पर्धा - प्रथम : गीतांजली आवारे, समृद्धी कवडे, द्वितीय : निकिता बाऱ्हे, पूजा दैठणकर, तृतीय : अंशीका मौर्या, साक्षी मोहर.

टॅग्स :Organ donationअवयव दानGulabrao Patilगुलाबराव पाटील