हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी मुस्लीम बांधवांना स्वत:ची हक्काची जागा मिळाली आहे. पवित्र रमजान पर्वात यासाठीच्या रकमेच्या धनादेशाचा शेवटचा हप्ता मिळाल्याने मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त कले आहे.मुस्लीम कब्रस्तानसाठी जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेंतर्गत पाच लाखांच्या निधीचा तिसरा व शेवटचा हप्ता शेख रहेमान शेख उस्मान यांना प्राप्त झाला. खासदार रक्षा खडसे, जि.प. सदस्य जयपाल बोदडे, सभापती शुभांगी भोलाणे, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शेख शकील, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अमित, माजी सरपंच समाधान कार्ले, ग्रा.पं.सदस्य नामदेव भड, शेख रहेमान शेख उस्मान यांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊसवर शुक्रवारी हा हप्ता प्रदान करण्यात आला. २६ लाखांपैकी याआधी १०-१० लाखांचे दोन धनादेश गेल्या वर्षी प्रदान करण्यात आले होते. शेवटचा हप्ता बाकी होता. तो आज प्रदान करण्यात आला.येथे मुस्लीम बांधवांसाठी कब्रस्तानात दफनविधीसाठी हक्काची जागा नव्हती. शेत विकत घेऊन त्याबाबत एकनाथराव खडसे यांच्याकडे भाजप कार्यकर्ते व मुस्लीम बांधवांनी समस्या मांडली होती. जि.प.च्या जनसुविधा योजनेंतर्गत २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. येथील शिवारातील गावानजीकच शेख शबानाबी शेख रहेमान व शेख रहेमान शेख उस्मान यांच्या शेताच्या मालकीच्या गट नंबर ६८४ मधील ८१ आर.क्षेत्र मुस्लीम कब्रस्तानासाठी खरेदी करून दिले आहे.जागा मिळावी यासाठी माजी सरपंच समाधान कार्ले, ग्रा.पं. सदस्य नामदेव भड, शेख रहेमान शेख उस्मान, शेख आमद मोहम्मद, सैयद फरीद, शेख मेहबूब, शेख फकिरा, मोहसीन खान, शेख शरीफ मेकॅनिक , पंढरी काळे, शेख गफूर, दिलावरखान, भाजप अल्पसंख्याकाचे शहराध्यक्ष शेख यासीन मुसा, शांताराम निकम, शेख शाबीर आदींनी परिश्रम घेतले होते. पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांना कब्रस्तानसाठी हक्काची जागा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी मिळाली हक्काची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:38 IST
हरताळे येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी मुस्लीम बांधवांना स्वत:ची हक्काची जागा मिळाली आहे. पवित्र रमजान पर्वात यासाठीच्या रकमेच्या धनादेशाचा शेवटचा हप्ता मिळाल्याने मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त कले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी मिळाली हक्काची जागा
ठळक मुद्देपवित्र रमजान पर्वात समाज बांधवांमध्ये समाधानतिसरा व शेवटचा हप्ता प्रदानगट नंबर ६८४ मधील ८१ आर.क्षेत्र मुस्लीम कब्रस्तानासाठी खरेदी