शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवस फेडण्यासाठी या ठिकाणी वाटला जातो गुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:19 IST

भैरवनाथ महाराज नवसाला पावतात ही भाविकांची श्रद्धा आहे. संकट टाळण्यासाठी याठिकाणी नवस मानले जातात.

ठळक मुद्देमहिंदळे येथील यात्रोत्सवास १०० वर्षाची परंपराधनसिंग भिल ओढतात बारा गाड्यासर्प दंश झाल्यास भाविक करतात भैरवनाथांचा धावा करतात

महिंदळे ता.भडगाव : महिंदळे येथील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या व पाच दिवस चालणा-या भैरवनाथ यात्रोत्सवास विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांनी सुरूवात झाली.या यात्रोत्सवात किर्तन व्याख्यानाने सुरूवात होते. १३ रोजी सकाळी भैरवनाथ अभिषेक सोहळा व भव्य पालखी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण बारा गाड्या ओढणे हे आहे. धनसिंग भिल हे एकटे बारा गाड्या ओढतात.नवस फेडण्यासाठी गुळ वाटण्याची प्रथाभैरवनाथ महाराज नवसाला पावतात ही भाविकांची श्रद्धा आहे. संकट टाळण्यासाठी याठिकाणी नवस मानले जातात. आपली दुभती गुरे आजारी पडली तरीही येथे नवस मानले जातात. तर काही जण अपत्यप्राप्तीसाठी नवस मानतात. ज्याचा नवस मानलेला आहे, त्याच्या अंगावर दगड उतरवून ठेवतात व त्या दगडांच्या वजना इतक्या गुळाचे वाटप केले जाते. काही जण त्या व्यक्तीच्या वजना इतका गुळ वाटप करतात. यासोबतच वरण बट्टीचाही नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात.पूर्र्वी सर्प दंश झालेल्या व्यक्तीस याठिकाणी आणून सर्प विष उतरविले जात असल्याचे जाणकार सांगतात. आजही काही भाविक सर्प दंश झाल्यास भैरवनाथांचा धावा करतात व नवस मानतात.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव