शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

पिंप्रीहाट-घुसर्डी शिवारात लाखावर केळीखोड उपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 21:59 IST

 सीएमव्ही बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्याची मागणी

खेडगाव, ता. भडगाव : तालुक्यातील गिरणा काठालगतच्या पिंप्रीहाट,घुसर्डी व कोळगाव या शिवारातील जुन-जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा(सीएमव्ही) प्रादुर्भाव झाल्याने तब्बल एक लाखावर केळी व खोड शेतक-यांनी उपटुन फेकले आहे. व्हायरसग्रस्त केळी क्षेत्राचे ३ संप्टेबंरपर्यंत पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतांनाही कृषिविभागाकडून विलंब होत आहे. रावेर, मुक्ताईनगर या तापीकाठाबरोबर आता गिरणापट्टाही या व्हायरसच्या कचाट्यात सापडला आहे.व्हायरसग्रस्त केळी क्षेत्राचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे.मात्र कृषिसहाय्यक पदे रिक्त असल्याने, अतिरिक्त भार १० कर्मचाऱ्यांवर आहे.तरीदेखील कृषिविभागाचा कर्मचारी, ग्रामसेवक व तलाठी यांचेवर जबाबदारी देण्यात आली आहे. सरपंच , जबाबदार पदाधिकारी यांच्या माहितीनुसार देखील पंचनाम्यात मदत घेतली जात आहे. असे तालुका कृषि अधिकारी बी.बी.गोराडे यांनी ‘लोकमत’ला सांगीतलेया भागात शेतकºयांनी लागवड केलेल्या टिश्शु कल्चर रोपांबरोबर इतर ठिकाणाहून आणलेल्या केळी खोड लागवडीवर देखील हा व्हायरस पसरला आहे.यामुळे सरसकट दिड-दोन महीन्याची केळी उपटुन फेकावी लागत आहे. रोप,खोड विकत घेत, लागवड, मशागत व रासायनिक खतांचा डोस असा एकरी तीस ते पन्नास हजारावर खर्च शेतकºयांचा झाला आहे. एरव्ही पाण्याअभावी केळी खोड उपटुन फेकण्याची वेळ शेतकºयांवर येते, तर आता हा व्हायरस आहे. मागील वर्षी गिरणा धरणात मुबलक पाणी असल्याने या भागात उशीराची मृग बाग लागवड वाढली आहे.आता हळुहळु हे सर्वच क्षेत्र या व्हायरसच्या कचाटयात सापडत आहे. त्यामुळे ते उपटुन फेकण्याची वेळ येत आहे.तालुक्यात जवळजवळ दोन ते चार हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते. तात्काळ व्हायरसग्रस्त केळीखोडांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी बागाईतदारांची मागणी आहे.