सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावर भरतेश्वर मंदिराजवळ ३ रोजी रात्री नऊच्या सुमारास मोटारसायकल (एमएफआर ३३४५)ला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या घटनेत मोटारसायकल स्वार रवींद्र सुकलाल दहिभाते (राममंदिर परिसर, पिंप्राळा, ता.जळगाव) याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला.घटनेचे वृत्त पोस्टला समजताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, जगदीश पाटील, इंडल पवार, देवा पाटील, रवींद्र मोरे यांनी धाव घेतली.अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अज्ञात वाहनाने धाडस देऊन मोटारसायकल स्वारास डोक्यास जबर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घटनास्थळी अपघातग्रस्तांची ओळख पटण्यासाठी पोलिसांना मयताच्या खिशातील ओळखपत्र आढळले. त्यावरून त्याची ओळख पटली.
सावद्याजवळ अपघातात पिंप्राळ्याचा दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:18 IST
अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावर भरतेश्वर मंदिराजवळ ३ रोजी रात्री नऊच्या सुमारास मोटारसायकल (एमएफआर ३३४५)ला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या घटनेत मोटारसायकल स्वार रवींद्र सुकलाल दहिभाते (राममंदिर परिसर, पिंप्राळा, ता.जळगाव) याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाला.
सावद्याजवळ अपघातात पिंप्राळ्याचा दुचाकीस्वार ठार
ठळक मुद्देखिशातील ओळखपत्रावरून पटली मयताची ओळखरावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनअज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत झाला अपघात